आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायगाव स्टेशनवर कोळशाच्या डब्याला आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गायगाव रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या कोळशाच्या डब्याला रविवारी आग लागली. डब्यातून धूर येत असल्याचे दिसून आल्याने तत्काळ आग विझवण्यात आली. आगीने जर रौद्ररूप धारण केले असते, तर इंधन डेपोला धोका निर्माण झाला असता.

१४ एप्रिलपासून गायगाव रेल्वेस्थानकावर कोळशाने भरलेली रेल्वे गाडी उभी आहे. या मालगाडीमध्ये पश्चिम बंगाल येथून कोळसा आणण्यात आला आणि तो भुसावळ पॉवर हाऊसला नेण्यात येत होता. अचानक रविवारी कोळशाने भरलेल्या डब्यातून धूर येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. लगेच अकोल्याहून अग्निशमन दलाचे बंब पाचारण करण्यात आले होते. मात्र, रेल्वे डब्याच्या स्थळी बंब पोहाेचत नसल्यामुळे ती गाडी परत गेली. त्यानंतर आग लागलेला डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला. नंतर दुसऱ्या ट्रॅकवर नेऊन पाण्याने आग विझवण्यात आली. गायगाव येथे इंधन डेपो असल्यामुळे आगीचे रूप जर भयंकर झाले असते, तर कदाचित अनर्थ घडला असता. अकोला आरपीएफचे ठाणे निरीक्षक राजेश बढे यांच्या नेतृत्वात त्यांचे पथक घटनेवर लक्ष ठेवून होते.