Home »Maharashtra »Vidarva »Akola» Cockane Dealer Arrested In Akola

‘हॅलाे, मै विक्की का दाेस्त बाेल रहा हूं’, असे म्हटल्यानंतर मिळे काेकेन; सांकेतिक भाषेत होत होता संवाद

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काेकेन जप्त केल्यानंतर अाराेपीकडून प्राथमिक माहिती प्राप्त केली.

प्रतिनिधी | Oct 07, 2017, 10:33 AM IST

  • ‘हॅलाे, मै विक्की का दाेस्त बाेल रहा हूं’, असे म्हटल्यानंतर मिळे काेकेन; सांकेतिक भाषेत होत होता संवाद
अकाेला -स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काेकेन जप्त केल्यानंतर अाराेपीकडून प्राथमिक माहिती प्राप्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अाराेपी महिन्यातून वेळा काेकेन अाणण्यासाठी मुंबईला जात हाेता. कोकेनच्या गाेळ्या मिळण्यासाठी अाराेपी मुंबईच्या नायजेरियन तस्कारामध्ये सांकेतिक भाषेत संवाद हाेत हाेता. ‘हॅलाे, मै विक्कीका दाेस्त बाेल रहा हू’, असे म्हणताच अाराेपीला काेकेन असलेल्या गाेळ्या मिळण्याचा मार्ग हाेत हाेता, अशी माहिती उजेडात अाली अाहे.
काेकेन प्रकरणी पोलिसांनी विजय उर्फ बाबू चंदू हिरोळे (वय १९, रा. रमाबाई आंबेडकर नगर, गुलजार पुरा, अकाेला) या अाराेपीला अटक केली असून, त्याची कसून चाैकशी केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकाेल्यातील काही धनदांडग्यांच्या मुलांसाठी काेकेन अाणण्याचे काम अाराेपी गत महिन्यांपासून करीत हाेता. त्याला प्रत्येक फेरीसाठी ४० हजार रुपये मिळत हाेते. ताे हे काेकेन एका नायजेरियन तस्काराकडून घेत हाेता. मात्र हा नायजेरियन तस्कर थेट अकाेला येथील एका धनदांडग्यांच्या मुलाच्या संपर्कात हाेता, असेही समजते. त्यामुळे अाराेपी मुंबईत पाेहाेचल्यानंतर त्या नायजेरियन तस्कराला भेटण्यासाठी आणि कोकेन मिळण्यासाठी सांकेतिक भाषेत संवाद साधत हाेता. या भाषेत संवाद साधल्यानंतरच हा तस्कर काेकेन उपलब्ध करुन देत हाेता. काेकेन प्रकरणाची कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी राहुल धस, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, उपनिरीक्षक रणजित ठाकूर, राजेश वानखडे, अमित दुबे , शक्ती कांबळे ,मनोज नागमोते, जितेंद्र हरणे, अजय नागरे, रवि पालीवाल यांनी केली.
व्यसनाधीन मुलांची गँग​ :सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार अकोल्यात मुलांसाठी हे काेकेन अाणण्यात येत हाेते. व्यापाऱ्यांच्या असलेली ही मुले नायजेरियन तस्काराच्या संपर्कात हाेती, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. या मुलांमध्ये एक विक्की नामक मुलगा असून, ताे त्याचे वडिल ‘क्वालिटी’च्या फर्निचरचा व्यवसाय करतात, असाही दावा सूत्रांनी केला अाहे. ही मुले नायजेरियन तस्काराच्या बँक खात्यात अाॅनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करीत हाेती. अाता नेमके काेणाच्या खात्यातून किती रुपये केव्हा-केव्हा ट्रान्सफर झाले, हे तपासाअंतीच निष्पन्न हाेणार अाहे.
एका गाेळीत ग्रॅम कोकेन : पोलिसांनी अाराेपीकडून गाेळ्या जप्त केल्या असून, प्रत्येक गाेळीत ग्रॅम काेकेन हाेते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरानुसार ही एक गाेळी लाख ४२ हजार ८५७ रुपयexची अाहे. ही गाेळी फाेडल्यानंतर त्यातून काेकेन बाहेर येते. व्यसनाधीन व्यक्तिच्या सवयीनुसार ताे राेज, आठवड्यातून दाेन ते तीन वेळा काेकेन घेताे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या अाहारी गेलेली मुले या व्यसनावर काेट्यवधी खर्चताना दिसून येत अाहे.
पोलिसांच्या काैशल्याची परिक्षा :सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार मुंबईत नायजेरियन तस्कर अाहेत. अंमली पदार्थांची तस्करी करणारे हे नायजेरियन नागरिक कोकेनच्या अाहारी गेले अाहेत. त्यांची शारिरीक क्षमता प्रचंड असून, ते काटकही अाहेत. त्यामुळे या एका नायजेरियन तस्काराला पकडण्यासाठी ते १० जणांची अावश्यक असते, असे जाणकारांचे म्हणणे अाहे. तसेच कितीही प्रयत्न केल्यास , बळाचा वापर केल्यानंतरही नायजेरियन तस्कर तस्करीशी संबंधितांची कोणतीच माहिती सांगत नाहीत, असा अाजपर्यंतच अनेक पोलिसांचा अनुभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे अाहे. त्यामुळे नायजेरियन तस्काराचा शाेध घेणे त्यांच्याकडून माहिती वदवून घेणे, यासाठी पोलिसांचा कस लागणार अाहे.
यापूर्वी चरस जप्त
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी यापूर्वी चरस, ड्रग्स जप्त केले होते. ,सन १९९२, २००८,व २०१३ मध्ये या कारवाया करण्यात आल्या होत्या.

यांनी केली कारवाई
हीकारवाई पोलिस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी राहुल धस, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, उपनिरीक्षक रणजित ठाकूर, राजेश वानखडे, अमित दुबे , शक्ती कांबळे , मनोज नागमोते, रवि पालीवाल यांनी केली.
अशी केली चाचणी
जप्तकेलेला अमलीपदार्थ हा काेकेनच अाहे, याची खातर जमा हाेण्यासाठी पोलिसांनी अायकर विभागातून तपासणी किट अाणली हाेती. या किटमध्ये राॅडवरच्या टाेकदार बाजूवर काेकेन ठेवण्यात अाले. किटमध्ये तीन रंगाचे लाईट हाेते. काेकेन ठेवताच मीटरमधील हिरवा लाईट सुरु झाला. त्यामुळे हा अमलीपदार्थ काेकेन असल्याचे पुढे अाहे, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे अाहे.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी असा रचला सापळा
आरोपीला मुद्देमालासह पकडण्यासाठी पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला होता. पोलिसांची साध्या वेशातील दोन पथके मुंबईकडून येणाऱ्या फलाटावर तैनात करण्यात आली होती. ,आरोपी रेल्वेतून उतरताच त्याच्याकडे पोलिसांच्या खबऱ्याने पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा रेल्वे स्थानका बाहेर पर्यंत पाठलाग केला. आरोपी रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच त्याला ताब्यात घेतले.

Next Article

Recommended