आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: भाजप उमेदवार अग्रवाल यांच्यावर गुन्हा, गजानन महाराजांच्या छायाचित्रावर कमळ लावून प्रचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भाजपाचे प्रभाग क्रमांक चे उमेदवार विजय अग्रवाल यांनी महानगर पालिका प्रचाराची मुदत संपली असताना खुल्या जागेमध्ये श्री. गजानन महाराजांचे छायाचित्र लावून त्यावर भाजपा पक्षाचे कमळ चिन्ह लावून प्रचार केला. अशा तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध सोमवारी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

शिवसेेनेचे नेते विजय मालोकार यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिस महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई केली आहे. 

तक्रारीच्या अाधारे सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मनपा प्रशासनाच्या आचारसंहिता विभागाला माहिती दिली. पोलिसांनी मनपाच्या भरारी पथकाने मोरेश्वर कॉलनीत जाऊन कमानी काढल्या त्या जप्त केल्या. १९ ला सायं विजय अग्रवाल यांनी विजय संकल्प नावाचे गेट काढल्यामुळे मुदत संपल्यानंतरही प्रचार केल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी कलम ३७, शहर विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...