आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांनी केला स्त्री रुग्णालयाचा पाेस्टमार्टम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी साेयीसुविधांची पाहणी करताना अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. छाया : नीरज भांगे - Divya Marathi
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी साेयीसुविधांची पाहणी करताना अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. छाया : नीरज भांगे
अकोला- वेळसकाळी सव्वाअकराची. ठिकाण, स्त्री रुग्णालय. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत रुग्णालयात अाले अन् रुग्णालय प्रशासन खडबडून जागं झालं. सुविधांची बाेंबाबाेंब पाहून त्यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली.
साडेअकराच्या दरम्यान, कलेक्टर साहेब अचानक बाह्यरुग्ण विभागातील प्रवेशद्वाराजवळच्या वॉटर कूलरजवळ अाले...अन् म्हणाले ‘‘मॅडम, मी हे पाणी पिऊ शकतो का?’’ त्यावर वैद्यकीय अधीक्षिका म्हणाल्या, "नाही सर, वॉटर कूलर तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे'. जिल्हाधिकाऱ्यांनी "काय मॅडम, कशी तहान भागवणार तुम्ही रुग्णांची' असे म्हणत नाराजी दर्शवली. त्यानंतर बाह्यरुग्ण विभागात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांनी आपल्या समस्या साहेबांसमोर मांडल्या.

प्रशासनाच्या काही गाेष्टी खटकल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंग, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, अारएमअाे डॉ. संगीता काळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांना तातडीने महिला रुग्णांना उपचार मिळाला पाहिजे, असे सांगितले.

त्यानंतर एनअारएचएमसह आरोग्य विभागाच्या योजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्त्री रुग्णालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.

पाहणीदरम्यान डीपीला आग
जिल्हास्त्री रुग्णालयात नवजात शिशू कक्षाच्या बाजूला विद्यूत कंट्राेल रुम अाहे. जिल्हाधिकारी पाहणी करत असतानाच अचानक एसएनसीयूच्या बाजूला असलेल्या डीपी रूममध्ये आग लागली. बालरुग्ण विभागाच्या इंचार्ज सिस्टर सुषमा कदम यांनी अग्निप्रतिबंधक यंत्राच्या साहाय्याने आग विझवली. त्यामुळे दुर्घटना टळली. येथे नेहमी शॉर्ट सर्किट होत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. त्यावर कंट्राेल रुम इतरत्र हलवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना केली.

स्कॅनिंग करा
जन्मनोंदणीउपनिबंधक विभागातील कागदपत्रांची जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी केली. ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून घ्या. जेणेकरून प्रत्येक नोंद सुस्थितीत दीर्घकाळ टिकू शकेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच प्रशासनाला सायी-सुविधांबाबत सुचना केल्या.

निधीबाबत नाराजी
राष्ट्रीयग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या योजनांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या वेळी अखर्चित निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी योजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन करत १०० टक्के खर्च झालाच पाहिजे, असा इशारा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

बोर्ड दिसलेच पाहिजे
सोनोग्राफीकेंद्राच्या बाहेर पीसीपीएनडीटीचे बोर्ड लावले होते. त्यावर पडदा येत होता. जिल्हाधिकाऱ्यांनी एकतर बोर्ड ठेवा, नाही तर पडदा तरी काढून ठेवा, अशी सूचना केली. येथे गर्भलिंग निदान केले जात नाही गर्भलिंग निदान करण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षेची तरतूद आहे, असे मोठ्या अक्षरात दिसायला हवे, असे सांगितले.

चांगले उपचार व्हावेत
जिल्हाधिकाऱ्यांनीनवजात शिशू दक्षता विभागात भेट दिली. उपस्थित बालरोग तज्ज्ञ डॉ. कमलकिशोर ढोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उपचार सुविधेबाबत माहिती दिली. तोंडावर मास्क बांधून जिल्हाधिकाऱ्यांनी बाळांची जवळून पाहणी केली. बालकांवर चांगले उपचार करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थितांना केल्या.

वेळेवर सोनोग्राफी करा
रुग्णांचीसंख्या जास्त असली तरी सोनोग्राफी वेळेवर झाली नाही म्हणून कोणत्याही महिलेला त्रास हाेता कामा नये. सोनोग्राफी मशीनचीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. या वेळी डाॅ. भुईभार यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. सोनाेग्राफी होत नसल्याची ओरड होते, हा प्रकार थांबला पाहिजे, असेही ते म्हणाले.

११.३० वाजता वॉटर कूलर पाहून पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली. तत्पूर्वी रुग्णालयातील दस्तएेवज सांभाळण्याच्या सूचना केल्या.
११.२० वाजता- साेनाेग्राफी मशीनची पाहणी केली. या ठिकाणी गर्भलिंगनिदान कायद्याचे स्पष्ट फलक िदसावे, अशा सूचना केल्या.
११.१५ वाजता- रक्तपेढीला भेट देऊन पुरेसा रक्तसाठा ठेवण्याच्या सूचना केल्या. तपासणी कक्षातील डाॅक्टरांशी चर्चा केली.
बातम्या आणखी आहेत...