आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टरांनी सिनेस्टाइलरीत्या देशी दारूचे दुकान केले सील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- संध्याकाळचीवाजताची वेळ. लालदिव्याची गाडी जठारपेठ चौकातील दारूच्या दुकानाच्या बाजूला थांबली. गाडीतून जिल्हाधिकारी उतरले अन् चालत थेट राजदीप देशी दारूच्या दुकानात गेले. खिशातून पन्नासची नाेट काढत दुकानदाराला देशी दारूची ‘क्वॉर्टर’ मागितली. ४५.५० रुपये किंमत असलेली क्वॉर्टर घेतल्यावर उर्वरित साडेचार रुपये परत मागितले. मात्र, पैसे देता ‘चालता हो’ म्हणत दुकानदाराने हाकलले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच इंगा दाखवला. जास्त दराने दारू विकणारे हे दुकान रात्री सील करण्यात अाले.
जिल्ह्यात दारू दुकानामध्ये दुकानदार मूळ किमतीपेक्षा अधिक पैसे घेतात. मात्र, त्याची कुणीही तक्रार करत नाही. अशा तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी स्वत:च स्टिंग ऑपरेशन करायचे ठरवले. त्यानुसार ते स्वत: त्यांच्या अंगरक्षकाला बाजूला ठेवत दुकानात गेले आणि दारू विकत घेतली. मात्र, उर्वरित पैसे देण्यास त्यांना नकार दिला.
जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्वाती काकडे यांना फोनवरून माहिती दिली. तसेच रेसिडेन्सी परिसरात देशी दारू विक्रीचा परवाना कसा दिला, हे सर्व तपासण्याचे आदेश दिले. रात्री काकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून एम. जी. राऊत यांच्या राजदीप देशी दारू दुकानाला सील ठोकले.

आदेशावरून कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांचामला फोन आला. जादा दराने दारू विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आदेशावरून दुकानाला सील करण्याची कारवाई केली आहे.'' स्वातीकाकडे, अधीक्षिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग.
तक्रार करा
कुणीजादा दराने दारूची विक्री करत असेल, तर त्यांनी आपल्याकडे तक्रारी कराव्यात. अशा दुकानदारांवर कारवाई होईलच.'' जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी
असा झाला संवाद
कलेक्टर : (पन्नासचीनोट देत) देशी दारूची ‘क्वॉर्टर’ द्या.
नोकर: (क्वॉर्टरदेत) हे घ्या.
कलेक्टर: उरलेलेपैसे?
नोकर: घ्यायचीतर घे, नाहीतर चालता हो.
कलेक्टर: (दुकानातूनक्वॉर्टर घेत बाहेर आले बॉडीगार्डला म्हणाले) दुकानाच्या मालकाला बाहेर बोलाव.
बॉडीगार्ड: यससर!
दुकानदार: कायझाले?
कलेक्टर: कारे बाबा जादा दराने तुम्ही दारू का विकता. वरचे सुटे पैसे का देत नाही?
दुकानदार: (नोकराकडेपाहत) यांना पाच रुपयांचा चकना देरे.
कलेक्टर: दारूपिण्यासाठी नाही आलो. तुम्हाला चकना विकण्याचा परवाना आहे का?
त्यानंतर कलेक्टरांनी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना फोन करून दुकान सील करण्याचे आदेश दिले.