अकोला- महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी २४ नोव्हेंबरला सिव्हिल लाइन ते मुख्य पोस्ट ऑफिस या रस्त्याच्या कामाची पुन्हा एकदा पाहणी केली. रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे, यासाठी आयुक्त बारीकसारीक बाबींवरही लक्ष देत आहेत. या पाहणीत त्यांनी संबंधित कंत्राटदाराला रस्त्याचे काम जलदगतीने करण्याची सूचनाही केली.
रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी आयुक्त अजय लहाने यांनी विद्युत खांब हटवण्याचा निर्णय घेतला. यासोबतच काही झाडेही काढावी लागली. परंतु, रस्ता रुंदीकरणासाठी हा निर्णय घेणे गरजेचे होते. तूर्तास विद्युत खांब हटवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, झाडे काढली गेली असली तरी झाडांची मुळं कंत्राटदारासाठी डोकेदुखी ठरले आहेत. दोन दिवसांपासून झाडांची मुळं काढण्याचे काम सुरू आहे. परंतु, खोड मोठ्या आकाराचे असल्याने जेसीबी मशीनही हतबल झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी या कामासाठी स्वतंत्र जेसीबी मशीन लावण्याची सूचना कंत्राटदाराला केली. त्याचबरोबर खोदकामही जलदगतीने करण्याची सूचना केली.
जलवाहिनीसहकेबलही निकामी : रस्त्याच्याखोदकामात नियमानुसार साडेचार ते पाच फूट खोल केबल टाकल्या गेले नाहीत. केबल दीड फूट खोलीवर टाकल्याने रस्त्याच्या खोदाईत केबल तुटल्या गेले तर झाडाची मुळं काढताना काही जलवाहिन्याही निकामी झाल्या. या जलवाहिन्या जोडण्याचे आदेशही आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.