आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामधील हजार ८३५ शाळांत लागतील तक्रारपेट्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला -  शिक्षिका,विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याचा निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभागाने घेतला असून, शनिवारी जिल्ह्यातील संबंधित शाळांना पत्र पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यातील हजार ८३५ शाळांमध्ये तक्रार पेट्या लागणार अाहेत. तक्रारकर्त्याचे नाव गुप्त राहणार अाहे. 
 
शाळांमध्ये विद्यार्थी-िवद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत ठाेस उपाययाेजना करण्याची अावश्यकता निर्माण झाली अाहे. अनेकदा अत्याचार, अन्यायाबाबत विद्यार्थी-िवद्यार्थिनी चर्चा करत नाहीत. त्यामुळे अाता शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, याबाबतचे परिपत्रक शुक्रवारी जारी केले. राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्यात येणार अाहेत. 
यासाठी शाळा व्यवस्थापन, शाळा प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागणार अाहे. यासाठी शिक्षण संचालकांना पाठपुरावा करावा लागणार असून, उपसंचालकांकडून माहिती प्राप्त करून शासनाला अहवाल सादर करावा लागणार अाहे. तक्रार पेटीतील तक्रारींची नाेंद घेऊन तक्रार निवारणासाठी पुढाकार घ्यावा लागणार अाहे. निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. 
लैंगिकछळाच्या तक्रारी समितीसमाेर येणार 

शाळेतीलिशक्षिका, विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमाेर ठेवण्यात येणार अाहेत. तसेच या तक्रारींची चर्चा शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीतही करण्यात येणार अाहे. दाेन्ही समित्यांनी याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन पुढील कार्यवाही तातडीने करणे अपेक्षित राहणार अाहे. 

कायम्हणतात शिक्षणाधिकारी 
जिल्हापरिषद शाळांमध्ये तक्रार निवारण समित्या यापूर्वीच स्थापन केल्या असून, अाता तक्रार पेटी बसवण्याची सूचना शाळा व्यवस्थापनाला देण्यात येत अाहेत. तक्रार पेट्या जून महिन्यात बसवण्यासाठी पाठपुरावा करू, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले. अनुदानित, विनाअनुदानित अशा एकूण ४३९ शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याची सूचना संबंधितांना देण्यात येणार अाहे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद म्हणाले. 

प्रशासनाला हे करावे लागणार.. 
Àतक्रार पेटी जिल्ह्यातील शाळेच्या दर्शनी भागावर (प्रवेशद्वाराच्या नजीक) बसवावी लागणार अाहे. पेटी पुरेशी मापाची सुरक्षित असावी. 

Àतक्रार पेटी अाठवड्यात कामकाजाच्या शेवट्याच्या िदवशी उघडण्यात यावी. तक्रारपेटी मुख्याध्यापक, प्राचार्य, पाेलिस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, िवद्यार्थी प्रतिनिधींच्या समक्ष उघडण्यात यावी. उपलब्ध असल्यास पाेलिस पाटील यांचीही मदत घेण्यात येणार अाहे. 
Àगंभीर, संवेदनशील स्वरुपाच्या तक्रारींबाबत पाेलिस यंत्रणांचे सहाय्य तात्काळ घ्यावे, अशाही सूचना दिल्या अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...