आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिडींग शिवाय दिली जातात विद्युत देयके, तक्रार निवारण शिबिरामध्‍ये ग्राहकांचा संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रिडींगकरता अॅव्हरेज देयकांच्या नावाखाली ग्राहकांना विद्युत देयके दिली जात असल्याने ग्राहकांनी याबाबत रोष व्यक्त केला. 2 ऑगस्ट रोजी विद्युत भवनमध्ये ग्राहक सुसंवाद तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

ग्राहकांच्या देयकांमध्ये तफावत दिसत आहे. १०० युनिटपर्यंत ज्यांचा वीज वापर असतो त्यांना ३५० युनिटचे देयक दिले जात आहे. वारंवार तक्रार करुनही त्यात सुधारणा होत नाही. महावितरणने मिटर रिडींगचे काम कंत्राटदाराकडे सोपवले आहे.

त्यांनी व्यवस्थित रिडींग घेऊन ग्राहकांना देयके वितरीत करणे बंधनकारक आहे. महावितरणच्या वरिष्ठांनी तशा सूचना दिल्या आहेत परंतु ग्राहकांना अनुभव मात्र त्रासदायक येतो. हातची कामे सोडून देयकांच्या दुरुस्तीसाठी महावितरणचे कार्यालय गाठावे लागते. बुधवारीही बरेच ग्राहक विद्युत भवनला पोहचले होते. त्यांनी अडचणी मांडल्या. फोटो रिडींगची पद्धत अवलंबली जात असली तरी ग्राहकांच्या बिलावरील मिटरच्या फोटोवरील नोंदी वाचता येत नाही. त्यामुळे रिडींग घेणाऱ्याने खरेच फोटो काढला की कॉपी पेस्ट केले या बाबत सांगता येत नाही. अशीही उदाहरणे महावितरणच्या यंत्रणेसमोर ठेवण्यात आली.
 
बातम्या आणखी आहेत...