आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘व्हिप’च्या मुद्द्यावरून शिवसेनेमध्ये सुरू झाले घमासान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हापरिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाअाघाडीच्या पराभवानंतर शिवसेनेत अाता मतदानासाठी जारी केलेल्या अादेशावरून घमासान सुरू झाले अाहे. निवडणुकीत तटस्थ राहिल्याने उपजिल्हाप्रमुख पदावरून काढलेल्या जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी काेणताच अादेश मिळाला नसल्याचा दावा केला असून, गटनेत्यांनी मात्र अादेश जारी झाल्याचा दावा केला अाहे. त्यामुळे याचे पडसाद अाता सभापती निवड प्रक्रियेत उमटण्याची शक्यता वर्तवली जात अाहे.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेपासून भारिप-बमसंला दूर ठेवण्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्षांची महाअाघाडी तयार केली. महाअाघाडीकडून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी दाेन्ही अपक्ष सदस्यांना रिंगणात उतरवले. महाअाघाडीतील सर्व सदस्यांचे तीनही पक्षांच्या नेत्यांनी ‘समुपदेशन’ केले. मात्र, निवडणुकीच्या काही तास अाधी सत्ताधारी भारिप-बमसंने खेळलेली खेळी यशस्वी झाली. शिवसेनेच्या माधुरी गावंडे यांनी भारिप-बमसंच्या उमेदवारांना मतदान केले, तर चंद्रशेखर पांडे हे तटस्थ राहिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्याही एका सदस्याने भारिप-बमसंला पाठिंबा दिल्याने महाअाघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. या घडामाेडीनंतर शिवसेनेत कारवाईचे सत्र सुरू झाले अाहे.परिणामी, अाता शिवसेनेत घमासान सुरू झाले अाहे.

संपर्कनेत्यांनी काढली हाेती समजूत : जिल्हापरिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाअाघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी शिवसेना संपर्क नेते खासदार अरविंद सावंत यांनी सदस्यांंची बैठक घेतली. त्यांनी मुख्यत्वे करून दाेन सदस्यांना ताकीदही दिली हाेती. मात्र, ही ताकीद महाअाघाडीला यशस्वी करू शकली नाही.

^ परिषदअध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याबाबत अादेश मिळाला नाही. शिवसेनेचा उमेदवार नसल्याने मी काेणालाही मतदान केले नाही. मी अाजही शिवसैनिकच अाहे.'' चंद्रशेखरपांडे, जिल्हा परिषद सदस्य

^महाअाघाडीच्या उमेदवारांनामतदान करण्याचा अादेश सभागृहातच जारी केला. इतर सदस्यांनी घेतला. मात्र, सेनेच्या दाेन सदस्यांनी अादेश घेण्यास नकार दिला. याची माहिती पक्षाच्या नेत्यांना दिली हाेती.'' ज्याेत्स्ना चाेरे, शिवसेना गटनेत्या

चुरस झाली कमी
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला जिल्ह्यात एकाही मदतदारसंघात विजय मिळाला नाही. त्यानंतर जिल्ह्यात नेतृत्व बदलासह संपूर्ण कार्यकारिणीत बदल हाेण्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला. या निवडणुकीनंतर पुन्हा फेरबदलाचे वारे सुरू झाले. जिल्हाध्यक्षपदासाठी उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे यांच्या नावाची चर्चा सुरू हाेती. मात्र, अाता पांडे यांना उपजिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात अाल्याने जिल्हाप्रमुख पदासाठीची चुरस कमी झाली.
बातम्या आणखी आहेत...