आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता नसतानाही काँग्रेसमध्ये प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्याच्या विधीमंडळात काँग्रेसची सत्ता नाही. परंतु विधान परिषदेचे उपसभापती पद हे संवैधानिक पद असल्याने त्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडविण्याचे प्रचंड सामर्थ्य दडले आहे. या सामर्थ्याचा आपण पुरेपूर वापर करू, अशी कटिबद्धता माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
विधान परिषदेचे उपसभापती झाल्याबद्दल ठाकरे यांचा येथील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये सायंकाळी जंगी सत्कार करण्यात आला. ग्रामीण शहर काँग्रेसतर्फे आयोजित या कार्यक्रमातच कार्यकर्ता मेळावाही घेण्यात आला. अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हा प्रभारी डॉ. वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार नतीकोद्दीन खतीब, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके मदन भरगड, माजी मंत्री अजहर हुसेन आणि रामदास बोडखे, माजी आमदार सुधाकरराव गणगणे, लक्ष्मणराव तायडे शहराध्यक्ष असलेले बबनराव चौधरी, महिला काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्ष साधनाताई गावंडे सुषमा निचळ प्रामुख्याने उपस्थित होत्या.
प्रदीर्घ काळासाठी प्रदेशाध्यक्ष आणि आठ वर्षांपर्यंत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेक विषयांना स्पर्श केला. ते म्हणाले, मी लाल दिव्याच्या गाडीत बसत असलो तरी आपला पक्ष सत्तेत नाही. परंतु मी ज्या पदावर आहे, त्याद्वारे मंत्री किंवा सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना विचारणा करण्याचा मात्र मला अधिकार आहे. त्यामुळे सातत्याने रखडलेले जनहिताचे प्रश्न माझ्या लक्षात आणून द्या. ते धसास लावण्यासाठी मला विधान परिषदेच्या उपसभापतीचा खुबीने वापर करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा अमरावती विधान परिषदेचे उमेदवार संजय खोडके, जिल्हा प्रभारी डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख आणि कार्यक्रमाध्यक्ष हिदायत पटेल यांचीही भाषणे झालीत. प्रास्ताविक शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. संचालन अविनाश देशमुख कपील रावदेव यांनी केले. प्रारंभी पक्षातील विविध संघटनांच्या वतीने ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

ठाकरे म्हणाले, की पक्ष संघटनेला बळकटी मिळाली तरच निवडणुका जिंकणे सोईचे होईल. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने आणि सत्ताधारी (उपसभापती) म्हणून मी स्वत: जनतेचा भ्रमनिरास दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यांची ही होती उपस्थिती : कार्यक्रमालाकाँग्रेसच्या विविध संघटनांचे पदाधिकारी दादाराव मते, बाबाराव विखे पाटील, नगरसेवक अब्दुल जब्बारभाई, नाजीमभाई मब्बाभाई पहेलवान, उद्योजक रमाकांत खेतान, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, डॉ. झिशान हुसेन, महेश गणगणे, प्रवीण वखारिया, सौरभ चौधरी, महिला काँग्रेसच्या डॉ. स्वाती देशमुख, उषा विरक, संजीवनी बिहाडे, पुष्पा गुलवाडे, प्रा. प्रकाश तायडे, कामगार कल्याण केंद्राचे बद्रुज्जमा, साजीद खाँन पाटील, युकाँचे आकाश कवडे, एनएसयुआयचे निनाद मानकर, अल्पसंख्यक सेलचे जिल्हाध्यक्ष रफीक पटेल, हेमंत देशमुख, कशीश खान, अलीयार खान, संजय बोडखे, रितेश अग्रवाल, पराग कांबळे, सागर कावळे, आनंद वानखडे, अंशुमन देशमुख, रहेमान बाबू यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते.

आमदारांशी केला पत्रव्यवहार : विधानपरिषदेचे उपसभापती झाल्यानंतर ठाकरे यांनी विधी मंडळाच्या अर्थात विधान सभा विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना पत्रे लिहली. आपल्याद्वारे सातत्याने मांडले जाणारे परंतु पटलावर आलेले जनहिताचे काही प्रश्न असतील तर मला कळवा. त्यासाठी स्वतंत्रपणे मुंबईत बैठक आयोजित करुन सचिवांना विचारपूस करु. आवश्यकता भासल्यास मंत्र्यांना त्या प्रश्नाबाबत सभागृहात सविस्तर मांडणी करण्याचे निर्देश देऊ, असे या पत्रात लिहिल्याचेही त्यांनी सांगितले. कारण हा माझा संवैधानिक अधिकार आहे आणि त्याद्वारे जनतेची सेवा करण्याची अमुल्य संधी काँग्रेसला प्राप्त झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेची तयारी : आगामी महापालिका जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी नेत्यांवर जबाबदारी सोपविण्याचे सूत्र पुढे केले. ठाकरे म्हणाले, प्रत्येक जनसंघटनेच्या नेत्यावर विशिष्ट प्रभागांची जबाबदारी सोपवा.

शेतकरी उपेक्षितच
विदर्भासह राज्यातील शेतकरी अजूनही उपेक्षित आहे. पैसेवारीचे निकष पुढे करीत राज्य शासनाने विदर्भातील शेतकऱ्यांना नाडवले. केंद्र शासनाच्या पाहणी समितीच्या अहवालानंतर केंद्राने हजार कोटी रुपये द्यावे, असे सांगितले खरे. परंतु अद्याप ती रक्कम मिळाली नाही. अशाप्रकारे येथील शेतकरी उपेक्षित ठेवला गेला. शेतकऱ्यांचीच ही स्थिती असल्यामुळे शेतमजुर, सामान्य व्यक्तीही वर्तमान परिस्थितीही भांडतो आहे. यासाठीही काँग्रेसने जागरूक विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...