आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅंग्रेसमुळेच झाले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नुकसान : खा. पटेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - केंद्रातील युपीए राज्यातील अाघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला हाेता. मात्र काॅंग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणसह पक्षाने राकाॅंला लक्ष केले. परिणामी काॅंग्रेसमुळेच राकाॅंचे नुकसान झाल्याची घणाघती टिका खासदार खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी केली. ते ११ सप्टेंबर राेजी अकाेल्यात राष्ट्रवादी काॅंग्रेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बाेलत हाेते. राकाॅं नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार अाहे, असा इशारही पटेल यांनी दिला.
किर्ती नगरातील महेश भवनमध्ये अायाेजित कार्यकर्ता मेळाव्याच्या व्यासपीठावर माजी मंत्री अनिल देशमुख, प्रवक्ते अतुल लाेंढे, महिला नेत्या अाशा मिरगे, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन वाकाेडे, सैय्यद युसफ अली, सरर्फराज खान, पद्मा अहेरकर, नगरसेवक राजू मुलचंदानी, शिरीष धाेत्रे, प्रा. मधुकर कांबळे प्रामुख्याने उपस्थित हाेते.

भाजपने काळा पैसा भारतात अाणू, यासह प्रचंड अाश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. मात्र ना पैसा जनतेच्या खात्यात जमा झाला, ना अच्छे दिन अाले, अशी टिका खासदार पटेल यांनी केली. जिल्ह्यात पक्ष वाढसाठी प्रयत्न करा. यासाठी नागरिकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हा. भाजप सरकार प्रत्येक पातळीवर अपयशी ठरत असल्याचे जनतेच्या लक्षात अाणून द्या. अाता हाेत असलेला विकास हा काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अाघाडी सरकारने घेतलेल्य निर्णयामुळे हाेत असून, भाजपच्या केवळ दाेन-अडीच वर्षाच्या काळात कसा विकास हाेऊ शकताे, असा सवाल पेटल यांनी उपस्थित केला. प्रास्तविक जिल्हाध्यक्षिवजय देशमुख महामहानगराध्यक्ष अजय तापडीया यांनी केले. सूत्रसंचालन मंदा देशमुख यांनी केले. मेळाव्यात अनेक नेते, कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे स्वागत केले. मेळाव्याला माेठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित हाेते.
शरदपवार नंतर पटेलच -देशमुख : राष्ट्रवादीकाॅंग्रसेमध्ये शरद पवारनंतर नंबर दाेनचे नेते खासदार प्रफुल्ल पटेलच असल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले. त्यामुळे राकाॅंमध्ये विदर्भातील नंबर दाेनसाठी देशमुख यांनी 'फिल्डिंग’ लावल्याची चर्चा मेळाव्यात सुरु झाली. देशमुख यांनी राज्यातील भाजप सरकारवरही टिका केली. जनता निवडणुकांमध्ये अाश्वासनाला बळी पडली. भाजपने जनतेला दिलेला शब्द पाळला नाही, असेही ते म्हणाले. जिल्हयात पक्ष वाढीसाठी संधी अाहे. त्यामुळे मतभेद विसरुन कामाला लागा. पक्ष वाढीसाठी प्रभारींची नेमणूक करण्याची विनंतरीही त्यांनी नेत्यांना केली.

काय म्हणाले पटेल? : १)भाजपने राेजगार उपलब्ध करुन देण्याचे अाश्वासन पाळले नाही. २) भूमिपूजन झालेल्या रस्त्यांचे काम सुरु हाेण्याएेवजी रस्त्यांवर खड्डेच पडले. ३) सत्ताधारी भाजपमुळे अकाेल्यातील भूमिगत गटार याेजनेचा पैसा परत गेला. ४) राष्ट्रवादी काॅंग्रेस नेते, कार्यकर्ते विराेध करणे विसरले अाहेत. ५) अकाेला जिल्ह्यात राकाॅंप्रमाणेच काॅंग्रेसही शून्यच अाहे. ६) अल्पसंख्यांकांचा ठेका केवळ काॅंग्रेसने घेतला अाहे, असे काॅंग्रेसने समजू नये.
८०टक्के उमेदवार निश्चित : मनपासहस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीत ८० टक्के जागांसाठी उमेदवार निश्चित झाले अाहेत. अाघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यावा, पक्षाच्या निर्णयानुसार कामाला प्रारंभ करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी प्रास्तविकात सांगितले. यावर अाघाडीचा निर्णय स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन घेण्यात येईल, असे खासदार पटेल यांनी स्पष्ट केले.

हम ताे डुबे सनम...
हमताे डुबे सनम, तुमकाे भी साथ ले गये,’ असे काॅंग्रेसने राकाॅंसाेबत केल्याची टिका खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. मात्र राकाॅंला पाण्यच्या बाहेर कसे पडायचे, हे माहीत अाहे. अाम्हाला खूप चांगले पाेहाेता येते. त्यामुळे पक्ष केवळ अकाेला जिल्ह्यातच नाही, संपूर्ण राज्यात उसळी मारेल अाणि बाहेर पडले, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...