आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीच्या विरोधात निघाला काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नोटबंदीच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. पाचशे हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात येत असल्याचा निर्णय केंद्र सरकारने नाव्हेंबर रोजी घेतला होता. त्यानंतर नोटा बदलून घेण्यासाठी खातेदारांच्या बँक एटीएमसमोर रांगाच लागल्या होत्या. मात्र, चलनाचा तुटवडा असल्याने खातेदारांना मागणीनुसार त्यांच्या खात्यातून पैसे काढता येत नाहीत. दरम्यान, नोटीबंदीच्या विरोधात सोमवारी संपूर्ण देशात विरोधी पक्ष एकवटले. २८ नोव्हेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग
मोर्चातकाँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घाेषणा िदल्या. मोर्चात महानगराध्यक्ष माजी आमदार बबनराव चाैधरी, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, उषा िवरक, डाॅ. सुभाष कोरपे, चंद्रकांत सावजी, साजिद खान पठाण, महेंद्रसिंग सलूजा, महेबूब खान, अब्दुल जब्बार, निखिलेष िदवेकर, अवनिाश देशमुख, आनंदराव सपकाळ, अफसर कुरेशी, सुषमा निचळ, डाॅ. स्वाती देशमुख, िसमा ठाकरे, जयश्री भुईभार, कशिश खान, यशाेदा गायकवाड, प्रतिभा नगलकर, राजाभाऊ देशमुख, हाजी अनिक अहमद, बी. जी. डाेंगरे, कपिल रावदेव, नितीन ताकवाले, िवलास गाेतमारे, राजेश राऊत, निलेश देशमुख, तश्वर पटेल, संजय मेश्रामकर, सुरेश ढाकुलकर, गणेश कटारे, जाबीर खान, इस्माईल िटव्हीवाले आदीसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नोटाबंदीच्या निर्णयावर नेत्यांनी केली टीका
मोर्चाच्या संपारोपप्रसंगी काँग्रेस नेत्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर मोदी सरकारवर िटका केली. या वेळी महानगराध्यक्ष माजी आमदार बबनराव चाैधरी, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, डाॅ. सुभाष कोरपे, साजिद खान पठाण, महेंद्रसिंग सलूजा यांनी मनोगत व्यक्त केले. या नेत्यांनी नोटाबंदीनंतर दैनंदनि गरजा भागवण्यासाठी कसा त्रास होताे, याचा पाढाच वाचला. नागरिकांना या निर्णयाचा त्रास होत असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...