आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेत्यांत शाब्दिक चकमक, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या संगीता तायडे काँग्रेसमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काैलखेड परिसरातील शिवसेनेच्या नगरसेविका योगिता पावसाळे यांनी रविवारी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. काैलखेड परिसर हा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची घाेषणा केलेले शिवसेनेचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचा बालेकिल्ला म्हणून अाेळखला जाताे. नगरसेविका योगिता पावसाळे यांच्याकडेही गुलाबराव गावंडे यांच्या समर्थक म्हणूनच पाहिले जात हाेते. दरम्यान, याेगिता पावसाळे यांनी खासदार संजय धोत्रे , आमदार गोवर्धन शर्मा , आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, डॉ. विनोद बोर्डे, धनंजय गिरीधर, संजय जिरापुरे, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. 
 
यावेळी भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आणि कार्य करण्याची पद्धत यांवर आपला विश्वास असल्याचे मत नगरसेविका पावसाळे यांनी प्रवेशाप्रसंगी व्यक्त केले. जाहीर प्रवेश कार्यक्रमाला गणेश पावसाळे, नगरसेवक सागर शेगोकार, सुनीताताई अग्रवाल, अजय शर्मा, संजय बडोने , सुरेश अंधारे,विजय परमार, उकंडराव सोनोने, बबलू पळसपगार, जयंत मसने, लाला जोगी, श्याम विंचनकर, डॉ. लव्हाळे, शिव शर्मा, सुनील क्षीरसागर, संजय गोटफोडे, राजू मिश्रा,संजय पावसाळे, रवींद्र पावसाळे, पवन कोल्हे, विक्रांत देशमुख, प्रल्हादराव कापसे, गोपाल मिसळे, पांडुरंग हरमकार, नरेंद्र सराटे, गोविंदराव बावणे, अमोल टाळे, नंदू टोबरे, महेश चौबे, नारायण बावणे, संतोष ठाकरे, हितेश मुळे,विजय शिंदे, निलेश तायडे आदी उपस्थित हाेते.