आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता पक्षाचे नव्हे, जनतेचे प्रतिनिधीत्व करा; काँग्रेसचे थाली बजाव अांदाेलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तगड‌्या पाेलिस बंदाेबस्तात घेराव अांदाेलन करण्यात अाले. - Divya Marathi
तगड‌्या पाेलिस बंदाेबस्तात घेराव अांदाेलन करण्यात अाले.
अकोला- भरमसाठ करवाढीमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महापालिकेत बहुमत असले तरी मिळालेले पद हे पक्षासाठी नाही तर सर्व सामान्य जनतेसाठी आहे. याची जाण ठेवून सभागृहात पक्षाचे नव्हे तर जनतेचे प्रतिनिधीत्व करुन वाढीव कर रद्द करा, असे आवाहन भारिप-बमसंच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १८ ऑगस्टला मनपा पदाधिकाऱ्यांना केलेल्या घेराव आंदोलनात केले. यावेळी पदाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

दर चार वर्षानी करवाढ करता येते. परंतु १७ वर्षात करवाढ केल्याचे कारण पूढे करून सत्ताधारी गटाने अवाजवी करवाढ केली. या करवाढीमुळे केवळ निवासस्थाच्या करातच वाढ झाली नाही तर शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात झालेल्या करवाढीचा फटका सर्व सामान्यांना बसला. ही बाब लक्षात घेऊन दिव्य मराठीने मालमत्ता करवाढीबाबत सतत पाठपुरावा केला. भारिप-बमसंने या विरोधात सर्व प्रथम आंदोलनाला सुरवात केली. त्या नंतर कॉग्रेस, शिवसेनाही आंदोलनात उतरली. याचा परिणाम होऊन मालमत्ता करात १० टक्के कपात करण्याची घोषणा महापौर विजय अग्रवाल यांनी केली. या अनुषंगाने १९ ऑगस्टला सभा बोलावण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर भारिप-बमसंने करवाढीस जबाबदार असलेल्या पदाधिकाऱ्यांना घेराव घातला. 

महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, ठरावाचे सुचक हरीश आलिमचंदानी, अनुमोदक संजय बडोणे यांना भारिप-बमसंच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेराव घातला. प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी ढोल-ताशे बडवत कार्यकर्ते पोचले. कर कमी करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच आपल्या पक्षाचे महापालिकेत बहुमत असले आणि आपल्याकडे पदे असली तरी ही पदे पक्षासाठी नसून सर्व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहेत. त्यामुळे १९ ऑगस्टच्या सभेत सभागृहात पक्षाचे नव्हे तर सर्व सामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व करून वाढवलेला कर कमी करा, असे आवाहन भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी केले. विविध ठिकाणी झालेल्या या घेराव आंदोलनात जि.प.अध्यक्ष संध्याताई वाघोडे, माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, बालमुकुंद भिरड, नगरसेविका किरण बोराखडे, गटनेता अॅड.धनश्री अभ्यंकर-देव, प्रतिभा अवचार, माजी गटनेते गजानन गवई,देवकाबाई पातोंड, वंदनाताई वासनिक, डॉ. हर्षवर्धन मालोकार, मंगलाताई घाटोळे, सुनिल जगताप, आशिष तिवारी, विकास सदांशिव, राजु मोरे, निलेश दुधलम, , विजयकुमार लव्हाळे, गोपाल कोल्हे, गोदावरी जाधव, प्रा.प्रसन्नजित गवई, अरुंधती शिरसाट, सुरेखा ठोसर, सुवर्णा जाधव, सुफी साहेब, जि.प.उपाध्यक्ष जमीरखा अमाउल्लाखान,नगरसेवक बबलु जगताप, जमिलाबी शेख साबीर, बळीराम चिकटे, सिद्धार्थ शिरसाट, काशीराम साबळे,दिलीप मोहोड, ज्ञानेश्वर सुलताने, बाबाभाई, अकरम भाई, जि.प.चे गटनेते दामोदर जगताप, डी.एन.खंडारे, रमेशभाई भोजने, मनोहर पंजवानी, प्रा.सुरेश पाटकर, अॅड.प्रविण तायडे, पराग गवई, शेख फारुख, मिलिंद वाकोडे,शरद गवई, रामा तायडे, आसिफ खान, शेख साबीर, दिनकर वाघ, दिनकर नागे, अशोक देवर, अब्दुल रऊफ, राहुल लिंगायत, विलास जगताप आदी सहभागी झाले होते. 

४२ नगरसेवकांना पोस्टाद्वारे निवेदन 
पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन घेराव घालून कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. तर भाजपच्या उर्वरित ४२ नगरसेवकांना पोस्टाद्वारे निवेदन पाठवून १९ ऑगस्टच्या सभेत केलेली करवाढ कमी होण्याच्या बाजूने व्हावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. 

पत्नीने स्वीकारले निवेदन 
भारिप-बमसंचे कार्यकर्ते सर्व प्रथम महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी पोचले. मात्र यावेळी महापौर बाहेरगावी गेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या पत्नी तथा नगरसेविका सुनिता अग्रवाल यांना निवेदन दिले. तर उपमहापौर वैशाली शेळके, सभापती बाळ टाले, हरीश आलीमचंदानी, सुरेश बडोणे यांनाही निवेदन देण्यात आले. 

घेराव आणि चहा-नाष्टाही 
घेराव आंदोलनामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनकर्ते राजकीय असल्याने काही पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्त्यांसाठी चहा, नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनही केले आणि चहा,नाष्ट्याचा आस्वादही घेतला. 

‘त्या’ नेत्याची यशस्वी शिष्टाई 
अांदाेलनाचीमािहतीच नसल्याने िसटी काेतवाली पाेिलसांनी चांगलीच धावपळ झाली हाेती. अशातच अांदाेलक अाक्रमक हाेऊन िठय्या अांदाेलन करीत हाेते. त्यामुळे पाेिलस अांदाेलकांवर माेठी कारवाई करण्याच्या मानसिकतेत हाेते. अांदाेलकांना ताब्यात सिटी काेतवाली पाेिलस ठाण्यात अाणण्यात अाले. त्यानंतर पाेिलसांनी तीन नेत्यांशी कक्षात चर्चा केली. मात्र एका युवा नेत्याने केलेल्या शिष्टाईला यश अाले अािण पुढील गंभीर कारवाई टळली, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. 
 
काँग्रेसचे थाली बजाव अांदाेलन; पाेिलसांकडून झाला बळाचा वापर 
अवाढव्य मालमत्ता करवाढीच्या िवराेधात शुक्रवारी कांॅग्रेसतर्फे महापाैरांच्या कक्षात जाऊन थाली बजाव अांदाेलन करण्यात अाले. मात्र महापाैर कक्षात नसल्याने कांॅग्रेस नेत्यांनी महापािलकेच्या समाेर रस्त्यावर िठय्या िदला. अखेर पाेिलसांनी बळाचा वापर करीत अांदाेलकांना ताब्यात घेतले. 

अकाेलेकरांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या महापािलकेने केलेल्या अवाढव्य मालमत्ता कर िवराेधात काॅंग्रेसने २६ एप्रिल राेजी धरणे करुन अांदाेलनाचा बिगुल फुंकला हाेता. त्यानंतर काॅंग्रेसने अांदाेलनाच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप लाेकप्रतिनिधींच्या घरासमाेर घंटानाद केले. 

दरम्यान, १९ अाॅगस्ट राेजी हाेणाऱ्या महापािलकेच्या सभेच्या पृष्ठभूमीवर शुक्रवारी कांॅग्रेसने अांदाेलन केले. नगरसेवक साजीद खान पठाण यांच्या नेतृत्वात झालेल्या अांदाेलनात महासचिव राजेश भारती, माजी महापाैर मदन भरगड, महानगराध्यक्ष मदन भरगड, नगरसेवक डाॅ. झिशान हुसेन, माे. इरफान, माे. नाैशाद, पराग कांबळे, अंशुमन देशमुख, अाकाश कवडे, हरिष कटारिया, कपिल रावदेव, अनंत बगाडे अादी सहभागी झाले हाेते. 

काय म्हणाले अांदाेलक ?
महापािलकेनेकर वाढ कमी करण्याचा िनर्णय जाहीर केला. मात्र यापूर्वी करवाढीचा घेतलेला िनर्णय प्रथम रद्द करुन नंतर सुधािरत कर वाढीसाठी महासभेत चर्चा करण्यात यावी, अशी काॅंग्रेसन नेत्यांची मागणी हाेती. कर वाढ कमी करण्याची घाेषणा फसवी असल्याचा अाराेप नेत्यांनी केला. महापाैरांनी स्वत: येऊन अामच्या भावान जाणून घ्याव्यात, अशी मागणी करीत काॅंग्रेस नेत्यांनी भर रस्त्यातच ठिय्या िदला. या अांदाेलनाची काेणतीच मािहती नसल्याने पाेिलसांनी चांगलीच तारांबळ झाली. काेतवाली पाेिलसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अांदाेलकांची समजूत काढली. मात्र अांदाेलक मागणीवर ठाम असल्याने पाेिलसांनी बळाचा वापर करीत अांदाेलकांना गाडीत बवसले. यावेळी अांदाेलक पाेिलसांमध्ये झटापटही झाली. 
बातम्या आणखी आहेत...