आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चाने आयुक्तालय दणाणले, न्यायासाठी बांधकाम मजुरांचा एल्गार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला जिल्हा बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आठवडाभराच्या पावसाच्या झडीमुळे बांधकामे बंद असतानाही मजूरवर्ग मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाला.
‘बांधकाम मजूर एकतेचा विजय असो’, ‘मजुरांना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत हा मोर्चा सकाळी ११ वाजता अशोक वाटिका येथून निघाला. त्यानंतर बसस्थानक चौक, गांधी चौक, तहसील कार्यालयमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी पोलिसांनी शांतता सुव्यवस्था राखण्याकरिता बॅरिगेट्स लावून मोर्चेकऱ्यांना रोखले. त्यानंतर ठरावीक पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आपल्या निवेदनासह जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी आत्मियतेने मजुरांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच संबंधितांशी संपर्क साधून शक्य तेवढे लवकर समाधान काढून देण्याचे आश्वासन दिले. संघटित कामगारांच्या मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांप्रमाणे बांधकाम कल्याण मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांनासुद्धा सुविधा मिळाव्या. मजुरांच्या मुलामुलींच्या बुद्धिमत्ता शारीरिक विकासासाठी वाचनालय, ग्रंथालय, व्यायामशाळा देण्यात यावी. विमा, वैद्यकीय सुविधा मिळावी. मजुरांना सुरक्षा साधने देणाऱ्या ठेकेदारांवर, आस्थापना कंपनीवर कारवाई करावी आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश होता. या वेळी उपस्थित जनसमुदायाला संघटनेचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, प्रशांत मेश्राम, साबिर मौलाना, अब्दुल बशिर, सुनील वानखडे, संजय कमल अशोक, पंचशील गजघाटे आदींनी मार्गदर्शन केले. बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष अब्दुल बशिर, सचिव प्रशांत मेश्राम, गौतम मोटघरे, गणेश साळवे, सुरेश कारंडे, युवराज खडसे, दिनकर निकम, मारोती असलमोल, आत्माराम साठे, गणेश निळे, मंगेश कुरसिंगे, जाकीर शाह आदींनी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाचे आयोजन केले. निवेदनानंतर झालेल्या सभेत उपस्थितांनी आपले विचार मांडले. मोर्चामध्ये प्रामुख्याने तालुकाध्यक्ष गणेश हिरोळकर, गणेश नृपनारायण, नामदेव निखाडे, रमेश आखरे, बाळू काठोळे, संतोष जानोरकर, राजू वानखडे, गजानन लोखंडे, सुनील इंगळे, किसन भांगे, संदीप नरवने, अभिमन्यू इंगळे, विनायक इंगळे, शाखाध्यक्ष सुनील वंजारी, शेख बशिर, मनोज बाविसकार, सतीश वाघ, सुरेश मेथे, रवी राऊत, मदन वासनिक आदींचा सहभाग होता.
डॉ. गजानन नारे यांची राज्य कार्यकारिणीत वर्णी
मेस्टाचेराज्य अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी अमरावती विभाग अध्यक्ष डॉ. गजानन नारे यांची मेस्टाच्या राज्याच्या कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा मोर्चाप्रसंगी केली. तसेच नियुक्तिपत्रही सुपूर्द केले. मेस्टाच्या कार्यविस्तारासाठी डॉ. नारेंनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही नियुक्ती करून विश्वास व्यक्त करण्यात आला.