आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Container gas Tanker Accident On The Bridge Was Katepurna

कंटेनर-गॅस टँकरचा झाला काटेपूर्णा पुलावर अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - राष्ट्रीय महामार्गावरील काटेपूर्णा बसथांब्यानजीक काटेपूर्णा नदीच्या पुलावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही वाहने ७० फूट खोल असलेल्या नदीपात्रात कोसळल्याने एक जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, मूर्तिजापूरहून अकोल्याकडे शेतीउपयोगी फवारणीची औषधी घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक जीजे ०१ डीटी ५३२८ अकोल्याहून मूर्तिजापूरकडे जात असलेल्या गॅस टँकरची काटेपूर्णा नदीच्या पुलावर समोरासमोर धडक झाली. त्यानंतर ही दोन्ही वाहने पुलाखाली नदीपात्रात कोसळली. यामध्ये कंटेनरचालकांचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद रियाजुद्दीन रा. प्रतापगड असे मृतकाचे नाव आहे, तर गॅस टँकरचालक सुदैवाने बचावला असून, त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी नंदकिशोर काळे, बोरगावचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर, विलास जामनीकर, ज्ञानेश्वर मेंढे पाटील, शशिकांत पाटील, अरूण गावंडे धांडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली तेथे जमलेल्या लोकांना पांगवले. त्यानंतर पंचनामा केला.

अपघातामधील मृतदेह अकोला येथे पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्यानंतरही दोन्ही वाहने काटेपूर्णा पुलावरून नदीपात्रात कोसळली.