अकोला - मुलगी काम आटोपून घरी जात असताना तिचा पाठलाग करून तिची छेडछाड करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अकोट फैलमध्ये घडली. १६ वर्षाची मुलगी काम आटोपून घरी जात असताना विजय सुनिल वानखडे वय २२ रा. अकोट फैल हा त्याचा मित्र सचिन बंडू वाघमारे यांच्यासह दुचाकीवरून आला. त्यांनी या मुलीची छेड काढली आणि अश्लील शिवीगाळ केली. मुलीने अकोट फैल पोलिस ठाणे गाठून विजय वानखडे सचिन वाघमारे यांच्याविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३५४ ड, ५०९, ३४ सहकलम १२, पास्को अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी कोठडीत केली आहे.