आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमाल, मापाऱ्यांना मिळेल आता एक रुपयात भोजन, खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - स्थानिककृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच आता बाजार समितीचे घटक असलेल्या हमाल मापाऱ्यांना केवळ एक रुपयांत भोजन देण्याचा निर्णय शुकवार, २४ जुलै रोजी घेण्यात आला आहे.

विदर्भात सर्वात मोठ्या असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी प्रगती पॅनलचा झेंडा फडकल्यानंतर हा पहिलाच निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीत दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने माजी आमदार दिलीप सानंदा, भारिप-बहुजन महासंघाचे अशोक सोनोने, माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांच्या मार्गदर्शनात सभापती संतोष टाले उपसभापती नीलेश दिपके यांनी पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने बाजार समितीची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार, २४ जुलै समितीच्या सभागृहात पार पडली. या सभेत शेतकऱ्यासोबतच कष्टकरी हमाल मापारी बांधवांना एक रुपयांत भोजन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सभेला नवनिर्वाचीत संचालक विलास इंगळे, प्रमोद चिंचोलकर, श्रीकृष्ण धोटे, संजय झुनझुनवाला, विवेक मोहता, गणेश हिवराळे, श्रीकृष्ण टिकार, संजय वावगे, गजानन ढोरे, विमल पाटील, सुलोचना राऊत, लता वरखेडे, राजेश हेलोडे आदी उपस्थित होते.

पाणपोईच्या सुशोभीकरणास मिळाली मान्यता
बाजारसमितीच्या मुख्य आवारात असलेल्या पाणपोईचे सुशोभीकरण इतर विकास कामांना या सभेत मान्यता देण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी पडत असल्याने समितीच्या आवारात थंड पाण्याची व्यवस्था होईल.

विकासकामे करणार
बाजारसमितीच्या आवारात विविध विकास कामे करून समितीचा चेहरामोहरा बदलणार आहे. या बाबत आवश्यक ती कारवाई करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संतोषटाले, सभापती