आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दीवरून सेनेत संभ्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेची हद्दवाढ लक्षात घेऊन शिवसेनेने पूर्व आणि पश्चिम असे दोन महानगराध्यक्ष नियुक्त केले आहेत. मात्र पूर्व आणि पश्चिम यांची सिमा रेषा कोणती? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी कुणी कुठे काम पाहावे असा प्रश्न उपस्थित झाल्याने तोडगा काढण्यासाठी बैठक हाेणार आहे.

शिवसेनेत यापूर्वी एकच महानगराध्यक्षपद होते. मात्र आता महापालिकेची हद्दवाढ झाली. २८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेली महापालिका १२४ चौरस किलोमीटर क्षेत्रात व्यापली आहे. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांना काम करताना सोयीचे जावे आणि पक्ष वाढवण्यास मदत व्हावी, या हेतुने पूर्व विभाग आणि पश्चिम विभाग महानगरप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. पूर्व महानगराध्यक्षपदी अतुल पवनीकर तर पश्चिम महानगराध्यक्षपदी राजेश मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु पूर्व आणि पश्चिम म्हणजे शहराची पूर्व आणि पश्चिम विभागणी की अकोला पूर्व विधानसभा आणि अकोला पश्चिम विधानसभा यानुसार कार्यक्षेत्र राहणार? याबाबत दोन्ही महानगराध्यक्षांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळेच महानगराध्यक्षपद मिळाल्या नंतरही प्रत्यक्ष काम करताना अडचणी येत आहेत. मनपा निवडणुका तोंडावर आल्याने ही समस्या त्वरित निकाली काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जेणे करुन निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही महानगराध्यक्षांना प्रत्यक्ष काम सुरु करणे सोयीचे जाईल. ही बाब लक्षात घेऊनच आता पूर्व पश्चिम यांची सिमारेषा निश्चित केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...