आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस स्टेशन समोरच लाचखाेर एएसअाय गजाअाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - एका घटनेत दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी बाळापूर पाेलिस स्टेशनच्या एएसअायला (सहाय्यक पाेलिस उपनिरीक्षक) लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी अटक केली. 
 
बाळापूर पाेलिस स्टेशनअंतर्गत राहत असलेल्या दाेन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला हाेता. वादाचे पर्यावसान किरकाेळ हाणमारी झाली हाेती. हे प्रकरण नंतर पाेलिस स्टेशनपर्यंत पाेहाेचले. एका पाेलिस कर्मचाऱ्याने याबाबत दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी अाणि केवळ अदखलपात्र गुन्हाची नाेंद घेण्यासाठी पैशाची मागणी केली. तसेच या प्रकरणी अटक करण्यासाठीही पैशांची मागणी करण्यातअाली. दरम्यान, याबाबत फिर्यादीने एएसअाय संजय रामेश्वर पारसकर यांच्या विराेधात एसीबीकडे तक्रार नाेंदवली. एसीबीने सापळा रचला. शुक्रवारी एसीबीने पारसकरला अटक केली. ही कारवाई एसीबीचे पाेलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक सुनिता नाशिककर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय गाेर्ले, मंगेश माेहाेड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. 
 
दीड हजार जप्त : छाप्यात हजार ५०० रुपये जप्त केले. ही तक्रार खासगी इलेक्ट्रिशियनविरुद्ध झाली हाेती. स्टेशनच्या द्वाराजवळच लाचखाेरीची रक्कम स्वीकारल्याने वरिष्ठांचा वचक राहिला अाहे कि नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...