आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखाेर हवालदार तायडे गजाआड, २५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पातूरपोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार काशिराम तुळशिराम तायडे याला ट्रकचालकाकडून २५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

तक्रारदार ट्रकचालक लोणार येथून वाळू घेऊन चोहोट्टा बाजार येथे जात होता. त्याला सकाळी साडेनऊ वाजता ओव्हरलोड वाहतूक केल्याप्रकरणी अडवले तो ट्रक पातूर पोलिस ठाण्यात लावण्यात आला. त्यानंतर ट्रकचालक पोलिस ठाण्यात ट्रक घेण्यासाठी गेला असता ठाण्यात असलेल्या ड्युटी अंमलदार काशिराम तायडे याने त्याची रॉयल्टी ठेवून घेतली ट्रक सोडवून घेण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली. अडीच हजार रुपयांवर तडजोड झाली. रक्कम दिल्यास तुझा ट्रक सुटू देत नाही, अशी धमकी ट्रकचालकाला दिली. ट्रकचालकाने अकोला येथे येऊन एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने लगेच पडताळणी करून सकाळी पातूर पोलिस ठाण्यात सापळा लावला. या सापळ्यात काशिराम तायडेला रंगेहात अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तीन दिवसांत सलग पोलिस गजाआड
बार्शिटाकळीयेथील हेडकॉन्स्टेबलला लाचेची मागणी करताना अटक होण्यास ४८ तासही उलटत नाही, तोच पातूर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. माध्यमांमध्ये पोलिस पकडल्याच्या बातम्या थांबत नाहीत तोच दुसरी कारवाई झाल्याने पोलिस वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.