आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेषण अाहारात घाेळ; आता हाेणार कारवाई, जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
File Photo - Divya Marathi
File Photo
अकाेला : शालेय पाेषण अाहाराबाबतची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा अादेश बुधवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत सभापती पुंडकलीराव अरबट यांनी दिला. अनेक शाळांमध्ये शालेय पाेषण अाहार वितरित येत नाही. याबाबत नोव्हेंबर महिन्यात झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत चर्चा झाली.
 
याबाबत अनेकदा संबंधितांना अहवाल, माहिती सादर करण्यास शिक्षण विभागाने कळवले हाेते. मात्र माहितीच प्राप्त झाली नाही. त्यामुळे याप्रकरणी बाळापूर, अाकाेट अािण तेल्हारा येथील शालेय पाेषण अाहाराच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नाेटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. तसेच याबाबत चाैकशी करुन पुरवठादार, मुख्याध्यापकांसह जबाबदार असलेल्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही सभापतींनी दिल्या हाेत्या.
 
मात्र याबाबत पुढे काेणतीच कार्यवाही झाली नसल्याची बाब ११ जानेवारी राेजी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत पुढे अाली. सभेला सदस्या ज्याेत्सना चाेरे, संताेष वाकाेडे, शबाना खातून, सैफुल्ला खान, अक्षय लहाने यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर अादी उपस्थितीत हाेते. 
असाअाहे घाेळ :या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शालेय पाेषण अाहार वितरण घाेळ झाला अाहे.
 
अनेक ठिकाणी साठ्याची व्यवस्थित माहितीच ठेवण्यात अालेली नाही. काही ठिकाणी पावत्यावर संबंधितांच्या स्वाक्षऱ्याच नाहीत. मुलांना शासनाच्या निकषानुसार पाेषण अाहार दिला जात नसल्याचा अाराेपही पालक ग्रामस्थांमधून हाेत अाहे. 

शिक्षक पदस्थापेची हाेणार चाैकशी 
अकाेला पंचायत समितीअंतर्गत दाेन शाळांमध्ये मुख्याध्यापक पदवीधर शिक्षकाच्या पदस्थापनेचा प्रकार उजेडात अाला अाहे. शिवणी येथे गावंडे नामक मुख्याध्यापकाच्या नियुक्तीचे अादेश जारी झाले हाेते.
 
मात्र गावंडे यांना रुजू करुन घेण्यात अाले नाही. मात्र नंतर परिसरातील एका मुख्याध्यापिकेची नियुक्ती करण्यात अाली. तसेच पाटी येथील मालाेकार नामक पदवीधर शिक्षकाची सांगळूद येथे २९ डिसेंबर राेजी पदस्थापना करण्यात अाली. ही पदस्थापना शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारशीवरून गट विकास अधिकाऱ्यांनी केली. या दाेन्ही प्रकरणाची चाैकशी करण्याचा अादेश सभापती पुंडलीराव अरबट यांनी दिला.