आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळ याेजना विशेष दुरुस्तीच्या कामामध्ये झाला भ्रष्टाचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - पातूर-नंदापूरयेथे झालेल्या नळ याेजना विशेष दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची बाब उजेडात अाली असून, याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संबंधित उप विभागीय अभियंता शाखा अभियंत्यांकडून खुलासा मागवला अाहे. या कामात अनियमितता झाल्याचा ठपका ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने चाैकशी अहवालात ठेवला अाहे. 
 
सन २०१६ मध्ये पाणी टंचाई दूर करण्यासाठी नळ याेजना विशेष दुरुस्तीच्या कामासाठी लाख ८८ हजार ९५० रुपये मंजूर करण्यात अाले. या कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली. हे काम पातूर नंदापूर ग्रामपंचायततर्फे करण्यात अाले. काम लाखांपेक्षा जास्त असल्याने ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात अाली. कंत्राटदार राजू मार्तंडराव देशमुख यांना कामाचा अादेश देण्यात अाला. या कामावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता, शाखा अभियंता यांची देखरेख हाेती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण केले. दरम्यान, उपराेक्त कामाची सचिन लाखे इतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली. तसेच ते चाैकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमाेर उपाेषणासही बसले. त्यानंतर या कामाची ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली. नाेंदी प्रत्यक्ष कामात तफावत अाढळून अाली असून, याबाबत संबंधित अभियंत्यांकडून खुलासा मागवून उचित कार्यवाही करणे अावश्यक अाहे, असे चाैकशी करणाऱ्या प्रभारी उपकार्यकारी अभियंत्यांनी चाैकशी अहवालात नमूद केले अाहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन काेणती कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले.

 अभियंत्यांनी केले मूल्यांकन 
तक्रारीनंतर चाैकशीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अधिकाऱ्याची नियुक्ती केली. अधिकाऱ्याने सरपंच, ग्राम विकास अधिकाऱ्यास विचारणा केली. यावर त्यांनी कंत्राटदाराने केलेल्या कामाचे माेजमाप उपविभागीय अभियंता, शाखा अभियंत्यांनी केल्याचे सांगितले. मूल्यांकनानुसार कंत्राटदारास देयक अदा केल्याचेही चाैकशी अधिकाऱ्यास सांगण्यात अाले. 
 
अभियंत्यांकडून खुलासा मागितला 
२लाख७७ हजार ५२७ रुपये संबंधितांकडून वसूल करण्यात अाले अाहे. याबाबत संबंधित उप विभागीय अभियंता शाखा अभियंत्यांकडून खुलासा मागवण्यात अाला अाहे. हा खुलासा प्राप्त झाल्यानंतर याबाबतच्या पुढील कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यात येईल. -सुरेंद्रकाेपुलवार, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प. अकाेला
 
काय अाहे चाैकशी अहवालात? 
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रभारी उपकार्यकारी अभियंत्याने चाैकशी अहवाल तयार केला. त्यात पुढील बाबी आहेत. 
१) नळ याेजनेच्या दुरुस्ती कामाची प्रत्यक्ष कामाची ठिकाणी पाहणी केली. माेजमाप पुस्तिकेमधील कामाच्या नाेंदी प्रत्यक्ष कामात फरक अाढळला. 
२) दुरुस्ती कामापाेटीचे लाख ५१ हजार ४३९ रुपयांचे देयक उपविभागीय अभियंत्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागास सादर केले. विभागीयस्तरावर पडताळणी केल्यानंतर अावश्यक कपात करुन एकूण लाख ३० हजार ७५१ चे निव्वळ देयक ग्रा.पं.ला अदा केले. 
३) दुरुस्ती कामाचे प्रत्यक्ष मूल्यांकन लाख ५३ हजार २२४ चे हाेते. त्यामुळे जादा केलेले लाख ७७ हजार ५२७ रुपये कंत्राटदाराकडून वसूल करावे. 
बातम्या आणखी आहेत...