आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात कपाशी पिछाडीवर, सोयाबीनने घेतली आघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - खरीप हंगामाच्या पेरण्या गत काही दिवसांपासून सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ७१ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये कडधान्याचा पेरा गत वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. यासोबतच कॉटन बेल्ट समजल्या जाणाऱ्या शेती क्षेत्रात सोयाबीनची आघाडी कायम आहे, तर कपाशीचा पेरा पिछाडीवर असल्याचे चित्र खरीप हंगामात िदसून येत आहे. अद्याप जिल्ह्यातील २९ टक्के शेती क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत.

यापूर्वी जिल्ह्यात कपाशीचा पेरा क्रमांक एकवर राहत होता. परंतु, सहा ते सात वर्षांपासून साेयाबीनने कपाशीला पिछाडीवर टाकले आहे. कपाशीचा पेरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कपाशीची शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी ठरत असल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळत आहेत. गत वर्षीच्या शेती हंगामात कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस झाल्यामुळे कपाशीचे उत्पादन घटले. यासोबतच कपाशीच्या फर्दळीचा कापूसही झाला नाही. परिणामी, शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादनात घट सहन करावी लागली आहे. सोयाबीनचे उत्पादन घटल्यावर शेतकऱ्यांना कपाशीच्या समाधानकारक उत्पादनाच्या अपेक्षा होत्या. परंतु, कपाशीच्या पिकाने उत्पादनाचे गणित िबघडवले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीला संरक्षित सिंचन केले. परंतु, त्यांच्या कापसाला अपेक्षित प्रती क्विंटलचा भाव मिळाला नाही. एकंदरीत उत्पादन खर्च अधिक या तुलनेत उत्पन्न कमी अशा अनुभवामुळे शेतकरी कपाशीचे उत्पादन घेण्याबाबत फारसे उत्सुक नसल्याचे शेतकरी सांगतात. जून महिन्याच्या मध्यंतरी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीनचा पेरा वाढवल्याचे दिसत आहे. जुलैपर्यंत ७१ टक्के पेरण्या आटोपल्या असून, यामध्ये सोयाबीनचा पेरा प्रथम क्रमांकावर आहे.

शासकीय धोरणामुळे सोयाबीनला प्रोत्साहन : पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या वाढल्यामुळे पॅकेज अंतर्गत शासनाने सन २००६ ते २००७ मध्ये सोयाबीन िबयाणे अनुदान तत्त्वावर शेतकऱ्यांना वाटप केले. त्यामुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा दरवर्षी हळुवार वाढत गेला. तत्कालीन शासकीय धाेरणामुळे साेयाबीनला प्रोत्साहन मिळत गेले, अशी माहिती सूत्रांनी सांिगतली. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनचा पेरा खरीप हंगामात अग्रस्थानी असतो.

सोयाबीनचा मशागत खर्च कमी
गेल्या काही वर्षांपासून कपाशीच्या मशागत खर्चात वाढ झाली आहे. परंतु, कापसाला मिळणारा भाव कमी कायमच आहे. कपाशीच्या खर्च उत्पन्नातील तफावत शेतकऱ्यांना परवडणारी आहे. या तुलनेत सोयाबीनचा मशागत खर्च कमी असल्यामुळे या पिकाचा पेरा वाढला आहे. यावर्षी कडधान्याचा पेरा वाढला आहे. केशवराव मेतकर, शेतकरी, खैरखेड
बातम्या आणखी आहेत...