आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीला जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पतीला प्रथम जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. तीन महिन्यांपासून हा आरोपी कारागृहात होता.

राहित येथील उज्ज्वला या मुलीचा विवाह बोरगावमंजूच्या अभिमन्यू विक्रम ढवळेसोबत झाला होता. काही दिवसानंतर उज्ज्वलाने जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला होता. उज्ज्वलाचा भाऊ अमर वानखेडे यांनी अभिमन्यू ढवळे याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. जावई अभिमन्यू ढवळे याने बहिणीचा शारीरिक मानसिक छळ केला. जावयाचे अनैतिक संबंध असल्यामुळे तो बहिणीला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून बहिणीने २८ सप्टेंबर २०१५ रोजी जाळून घेतले. त्यात ती मरण पावली, असे वानखडे यांनी या तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून पोलिसांनी अभिमन्यू ढवळे याच्याविरुद्ध भादंविच्या ४९८ अ, ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. घटनेपासून आरोपी फरार होता. पोलिसांनी त्याला १७ डिसेंबर २०१५ रोजी अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. आरोपीच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता सोमवारी प्रथम जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. आरोपी पक्षाच्या वतीने अॅड. वैशाली गिरी भारती केशव एच. गिरी यांनी काम पाहिले.