आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया उमेदवारासह तिघांना कोठडी, तोतया परीक्षा देणाऱ्यांची टोळीच येणार उजेडात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हा पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा देणाऱ्या तोतया उमेदवारासह तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने मेपर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण भरती प्रक्रियेला बदनाम करण्यास कारणीभूत ठरलेल्या बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

१२ एप्रिल रोजी पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेत कडेकोट सुरक्षा यंत्रणेला भेदून लेखी परीक्षा देण्याचा प्रकार स्वत: उघडकीस आणल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशाेर मीणा यांनी तपासाची संपूर्ण सूत्रे स्वत: हातात घेत चौकशी सुरू केली आहे. औरंगाबाद तालुक्यातील जोडवाडी येथील राजू रामलाल बहुरे याच्या लेखी परीक्षेचा पेपर विठ्ठल त्र्यंबक सिसोदे याने दिला होता. संशयावरून क्रॉस चेकिंगमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. राजू बहुरे याला मदत करणाऱ्या त्याच्याच गावातील संदीप इंदर जाधव, कल्याणसिंग अंबरसिंग बमनावत यांच्याही भूमिका या गैरप्रकारात असल्यामुळे पोलिसांनी राजू बहुरे, विठ्ठल सिसोदे अंबरसिंग बनावत यांना ताब्यात घेऊन चौकशीअंती बुधवारी ताब्यात घेतले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जितेंद्र सोनवणे करत असून, गुरुवारी फरार आरोपीच्या शोधात त्यांचे पथक अकोल्याबाहेर होते.
दोषीअधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई : तोतयाउमेदवार विठ्ठल सिसोदे हा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आत गेला. त्याने फोटो दाखवून सह्या केल्या. ही प्रक्रिया पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे तोतया परीक्षेला बसू शकला. अन्यथा तो वेळीच पकडल्या गेल्या असता. कोणकोणते अधिकारी कर्मचारी बेजबाबदार वागले, त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
यामुद्द्यांवर दिली न्यायालयाने कोठडी :
आरोपी सर्व आैरंगाबाद येथील असल्यामुळे जाण्या-येण्यासाठी वेळ लागेल. आरोपींनी यापूर्वी राज्यात कुठे लेखी परीक्षा देण्याचा प्रकार केला आहे काय, या प्रकरणात आरोपींनी आणखी कुणाची मदत घेतली. त्यांच्या संपर्कात कोण-कोण आले, त्यासाठी आरोपींचा
माेबाइलसीडीआर काढून माहिती घेण्यासाठी मेपर्यंत पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ती मान्य केली.

सीसीटीव्हीत तोतया दिसतो, कर्मचारी दिसत नाही काय?
पोलिस प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अाधारे गैरप्रकार करणाऱ्यांचे मूळ शोधून काढले. याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तोतयाला सोडणारे अधिकारी कर्मचारी दिसत नाहीत काय, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांची नजर चुकवून तोतया परीक्षेला बसलाच नसेल. त्यामुळे जबाबदारीचे गांभीर्य नसलेल्यांना असेच सोडले जाईल काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिस प्रशासनाकडेच आहेत.