आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सव्वा तीन लाखांचा गुटखा पकडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली- एकासामाजिक कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणाऱ्या अॅपेवर कारवाई करून सव्वा तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई रविवार, सहा सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सोमवार, सात सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या गुटख्याबाबत रात्रीच पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही.

सामाजिक कार्यकर्ते किशोर कुहिटे यांना रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मेहकर फाटा परिसरात एक अॅपे नजर कंपनीच्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्वरित पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. या वेळी पोलिसांनी या गुटख्याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. अखेर पोलिसांनीच मेहकर फाट्यावर जाऊन अॅपे आणि गुटखा जप्त केला. दरम्यान, सोमवारी सकाळी बुलडाणा येथील अन्न औषध प्रशासन अधिकारी सिसोदिया यांनी पोलिस ठाण्यात जाऊन अॅपेतील सहा पोत्यांमधील तीन लाख २४ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी सिसोदिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अॅपेचा चालक शेख राजकी शेख सादिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.