आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगाली युवकाकडून नकली नोटा जप्त, मालेगाव पोलिसांनी केली कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव- येथीललक्ष्मी ट्रेडर्समध्ये खरेदीसाठी आलेल्या युवकाने दुकानदाराला दिलेल्या नोटा बनावट असल्याचा संशय आल्याने बिंग फुटले. त्यानंतर मालेगाव पोलिसांनी केलेल्या कारवाई बंगालमधील रहिवासी युवकाकडून नकली नोटा जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिस तपास करत आहेत.

लक्ष्मी ट्रेडर्सचे नरेश अग्रवाल यांनी तक्रार दिली की, शुक्रवार, ११ रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास ग्राहक त्यांच्याकडे आला. त्याने १३०० रुपयांचे सामान खरेदी केले. मालापोटी त्याने एक हजाराच्या दोन नोटा दुकानदाराला दिल्या. परंतु नोटा बनावट असल्याचे अग्रवाल यांना जाणवले. त्याची चौकशी केली असता युवक भांबावला. या नोटा आपण एटीएममधून काढल्याचे तो सांगत होता. परंतु तो खोटा बोलत असल्याचे दिसले. अग्रवाल यांचे शेजारी रमेश पांडे, साहेबराव शेवाळे यांनी त्या युवकाला पकडून मालेगाव पोलिस ठाण्याचे काळे यांना फोन केला. ते घटनास्थळी पोहोचले त्यांनी युवकाची चौकशी केली. त्याचे नाव दिजनपाल जलाकुमारपाल रा. चकलागढ पो. स्टे. बागुलवाडी, जि. दिनसपूर पश्चिम बंगाल असे सांगितले. त्याच्याजवळून एक हजार रुपयाच्या १६ नकली नोटा, ५०० रुपयाच्या १० नोटा, १०० रुपयाच्या ४९ नोटा, ५० रुपयाच्या नोटा, २० रुपयाच्या नोटा, १० रुपयाच्या २१ नोटा, कार्बन कंपनीचा मोबाइल असा ११,३५० रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून या मागे रॅकेट कार्यरत आहे का, यादृष्टीने तपास सुरू आहे. एपीआय एच. जी. कुलवंत तपास करत आहेत.