आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाख रुपये चोरी गेल्याची बनवेगिरी, अकोटमधील बसस्थानकातील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- बसमध्ये चढताना खिशातून दोन लाख रुपये चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या अचलपूर येथील एका युवकाने पोलिसांत तक्रार देण्याचा पवित्रा घेतल्याने या युवकाने बनवाबनवी करून पोलिस यंत्रणेसह प्रवाशांनाही वेठीस धरल्याची घटना शनिवारी येथील बसस्थानकावर घडली.

आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास अब्दुल मोहिद अब्दुल मतीन वय ३० रा. अचलपूर हा त्याची आई आणि मित्रासह वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे जाण्यासाठी अकोटला आला होता. परतवाडा ते अकोट बसने अकोटला आला त्यानंतर एमएच ४०, ८४४१ या क्रमांकाच्या बसने तो अकोटहून अकोला येथे जात होता. मात्र, या बसमध्ये चढताना पँटच्या खिशातून दाेन लाख रुपये चोरीस गेल्याचा कांगावा अब्दुल मोहिदने केला. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशांसह बस पोलिस ठाण्यात आणली. संशयित आरोपी शोधण्यासंदर्भात मोहिदला सांगितले. मात्र, बसमध्ये संशयित नसल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, दोन लाख रुपयांच्या नोटा कुठे ठेवल्या होत्या, नोटा कितीच्या होत्या असे प्रश्न विचारून पोलिसांनी मोहिदची चौकशी केली असता तो बुचकळ्यात पडला. त्यानंतर दोन लाख रुपये नाही तर एक लाख ३० हजार रुपये गेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने एक लाख २० हजार रुपये गेल्याचे सांगितले. त्यानंतर मोहिदचे वडील अब्दुल मतीन यांनी भ्रमणध्वनीवरून पोलिसांशी संपर्क साधून हे आमचे घरगुती प्रकरण आहे, फिर्याद द्यायची नाही, असे सांगितल्याने पाेलिसांनी प्रकरण बंद केल्याची माहिती ठाणेदार नागरे यांनी दिली.
अकोट येथे दोन लाख रुपये चोरी गेल्याचा बनाव करणारा अचलपूरचा युवक.

हे प्रकरण दुसरेच काही तरी असावे
दोनलाख रुपये एका खिशात बसतच नाहीत. त्यामुळे हे प्रकरण दुसरेच काही तरी असावे. तसेच याप्रकरणी फिर्यादही देण्यात आली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही.'' कैलासनागरे, ठाणेदारअकोट शहर पोलिस स्टेशन.