आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरली अड्ड्यावर छापा, सहा जणांना अटक, सहा आरोपींसह ५० हजारांचा माल जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने कौलखेड परिसरात सुरू असलेल्या वरली अड्ड्यावर छापा टाकून सहा आरोपींसह ५० हजारांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री ८.३० वाजता करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. तरीसुद्धा अवैध धंदे सुरूच आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मोहिमेला काही पोलिस अधिकारी सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत असून, त्यामुळे हे अवैध धंदे फोफावले आहेत. दरम्यान, सोमवारी प्राप्त गोपनीय माहितीच्या अाधारे एलसीबी पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या पथकाने कौलखेड भागातील एका कार्यालयात सुरू असलेल्या वरली अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी आरोपींकडून ३० हजार रुपये नगदी २० हजार रुपये मोबाइल, असा ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये राहुल अरुण कराळे, अजय रामकृष्ण िशंदे, सचिन दादाराव गावंडे, दादाराव सखाराम गावंडे, नितीन चिलवंत, राजेश लोहार यांना अटक केली आहे. ही कारवाई एलसीबी पथकातील हेडकॉन्स्टेबल विनायक टाले, दीपक तायडे, सुलतान पठाण, जय मांडवेकर, बाबुसिंग पठे, िनतीन मगर, रवी डाबेराव यांनी केली.