आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धांना मारहाण; पाच वर्षांची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- हॉटेलमध्ये नाष्टा केल्यानंतर पैसे देण्यास नकार देऊन हॉटेल मालकाच्या वृद्ध माता-पित्यास लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

२७ जून २०१४ रोजी रतनलाल प्लॉट येथील योगिनी शंकर पारडे यांच्या केतकर हॉटेलमध्ये त्यांची आई सुमन भीमराव पारडे (वय ६५) वडील भीमराव नारायण पारडे (वय ७०) हे बसले होते. या वेळी हॉटेलमध्ये अनिल गजानन घ्यारे त्याचा मित्र नीलेश उर्फ गोलू रामदास अंभोरे हे दोघे आले. त्यांनी नाष्टा केला पैसे देताच जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी योगिनी यांनी पैसे देण्याविषयी हटकले असता त्यांनी आम्हाला पैसे मागतेस काय म्हणून हॉटेलमध्ये तोडफोड केली. याप्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न त्यांच्या आई-वडिलांनी केला असता आरोपींनी त्यांना लोखंडी रॉडने मारून जखमी केले होते. त्यात सुमन पारडे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती तर भीमराव पारडे यांचा पाय मोडला होता. प्रकृती अत्यवस्थमुळे सुमन पारडे यांना नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार प्रकाश सावकार यांनी योगिनी पारडे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंवि ३०७, ३२७,, ३२५, ४५२, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले होते. त्याच दिवशी पोलिसांनी आरोपी अनिल घ्यारे याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक यू. व्ही. शेरजे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात झाली. याप्रकरणी साक्षीपुरावे तपासून न्यायालयाने आरोपी नीलेश उर्फ गोलू रामदास अंभोरे याची निर्दोष सुटका केली तर प्रमुख आरोपी अनिल घ्यारे याला भादंवि ३२६ अन्वये पाच वर्षाची शिक्षा २० हजार रुपयांचा दंड आणि दंड भरल्यास एक वर्षाची शिक्षा, भादंवि ४५२ अन्वये तीन वर्षांची शिक्षा पाच हजार रुपयांचा दंड दंड भरल्यास सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. मंगला पांडे यांनी काम पाहिले.
अनिलघ्यारे याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक यू. व्ही. शेरजे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात झाली. याप्रकरणी साक्षीपुरावे तपासून न्यायालयाने आरोपी नीलेश उर्फ गोलू रामदास अंभोरे याची निर्दोष सुटका केली तर प्रमुख आरोपी अनिल घ्यारे याला भादंवि ३२६ अन्वये पाच वर्षाची शिक्षा २० हजार रुपयांचा दंड आणि दंड भरल्यास एक वर्षाची शिक्षा, भादंवि ४५२ अन्वये तीन वर्षांची शिक्षा पाच हजार रुपयांचा दंड दंड भरल्यास सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. मंगला पांडे यांनी काम पाहिले.

अनेक गुन्ह्यांत अारोपी, शिक्षा या प्रकरणात
आरोपी अनिल गजानन घ्यारे याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, या प्रकरणातच त्याला शिक्षा झाली आहे. घटना घडल्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार प्रकाश सावकार त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी पप्पू ठाकूर नीलेश शर्मा यांनी काही वेळातच आरोपी पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला बसस्थानकावरून पकडले होते. विशेष म्हणजे घटनेपासून आरोपी हा आजपर्यंत कारागृहातच आहे.