नांदुरा- तालुक्यातील वडी येथे क्षुल्लक कारणावरून एका जणास वस्तरा मारून जखमी केल्याची घटना १५ जानेवारी रोजी घडली या प्रकरणी १७ जानेवारी रोजी कल्पना गजानन इंगळे यांच्या तक्रारीवरून तीन जणांना अटक करण्यात आली.
कल्पना गजानन इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, धनंजय वाघ यांची सायकल गजानन इंगळे यांनी त्यांच्या पायावर पाडली असता, सुरेश वाघ यांनी गजानन इंगळे यांच्या अंगावर वस्तऱ्याने वार करून जखमी केले. तसेच कल्पना गजानन इंगळे या भांडणे सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही शिवीगाळ मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून विजय सुरेश वाघ, सुशीला सुरेश वाघ, सुरेश किसन वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना १७ जानेवारीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास नांदुरा येथील एएसआय सुनील तायडे करत आहेत.