आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यापाऱ्यावर हल्ला; पाच संशयितांची ओळखपरेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बीकेट्रेडर्स किराणा मर्चंटचे ठोक व्यापारी गुरबानी बंधूंवर चार गुंडांनी गुरुवारी रात्री १० वाजता हल्ला चढवून १४ लाख रुपये लुटले होते. याप्रकरणी गुरुवारी रात्रीच पोलिसांनी नाकाबंदी करून पाच संशयितांना ताब्यात घेतले. गुरुवारी रात्री, शुक्रवारी दिवसभर खदान पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली.

धर्मेश बलराम गुरुबानी आणि त्यांचे बंधू सुनील गुरुबानी हे गुरुवारी रात्री ९.३० वाजता त्यांचे दुकान बंद करून दुचाकीने आपल्या घरी परतत होते. या वेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चार गुंडांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना निशू नर्सरी कोठारी शाळेच्या पाठीमागे गाठले. धर्मेश गुरुबानी यांच्या हातात १४ लाख रुपये असलेली पिशवी होती. गुंडांनी धर्मेश यांना लक्ष्य करत त्यांच्या मानेवर लाकडाच्या राफ्टरने मारले. त्यांनी तो मार चुकवला. त्यानंतर पुन्हा त्यांच्या डोक्यात मारले. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यामुळे गुरुबानी यांच्या हातातील पिशवी गुंडांनी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेऊन गुरुबानी बंधूंना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी नाकेबंदी केली आणि आरोपींचा शोध सुरू केला. रात्री उशिरा पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. या आरोपींच्या माध्यमातून पोलिसांना काही धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी या संशयितांची चौकशी केली. यापूर्वीही गुरुबानी यांच्यावर काही गुंडांनी हल्ला चढवला होता. त्या वेळी त्यांच्याकडून दोन लाख रुपये लुटले होते. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा छडा पोलिसांना अद्यापही लागला नसताना गुरुवारी हा दुसरा हल्ला झाला आहे. पोलिस गुन्हेगारांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत असून, पोलिसांविषयीचा धाक राहिला नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.