आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावर तुरी; पोलिस करणार "आग्रा'वारी, १३ लाखांची तूर अफरातफर प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- १३ लाख रुपयांच्या तूर अफरातफर प्रकरणात तपास करण्यासाठी पोलिस आग्रा येथे जाणार आहेत. या प्रकरणात तूर मध्येच कुठे गायब झाली याचा शोध घेणार आहेत.
धान्य व्यापारी दीपचंद चिरंजीलाल बिलाला यांची १६० पोते तूर ही आग्रा येथे जात होती. मात्र अकोल्यातील कॉटन मार्केट येथील न्यू युपी रोडवेजचे मालक नासीर खान यांच्यामार्फत पाठवलेली तूर आग्रा येथील मेसर्स बाबा घनशाम यांना मिळालीच नाही. त्यामुळे बिलाला यांनी या प्रकरणी रामदासपेठ पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी नासीर खान, ट्रकचालक अजयसिंग आकाशकुमार रामबीरसिंगविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर आरोपी नासीर खानला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. पोलिस आता या प्रकरणात आरोपीला घेऊन आग्रा येथे जाणार आहेत. तेथे तूर कोठे गायब झाली. याचा शोध घेणार आहेत.

विमाकंपन्यांचीही फसवणूक : अनेकट्रान्सपोर्ट व्यावसायिक माल घेऊन जातात. त्यानंतर ते व्यापाऱ्याला काहीही माहीत करता माल परस्पर विकतात. त्यानंतर धान्याचा मालक, व्यापारी पोलिसात तक्रार करतो. पोलिस तक्रारीच्या अाधारे धान्याचा काढलेला विम्यासाठी क्लेम केला जातो. कंपनीकडून ६०, ७० टक्के विमा मंजूर होतो. उर्वरित तुटीची रक्कम ही ट्रान्सपोर्टचे मालक त्यांचे भाडे कापून घेऊन व्यापाऱ्याला देतात. यामध्ये व्यापाऱ्याला तर रक्कम मिळतेच पण विमाकंपन्याची फसवणूक होते.