आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये घुसून गुंडांचा हैदोस, चार जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी घरात घुसून धुडगूस घातला. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अकोटफैलमधील भारतनगर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटांतील युवकांनी परस्परांविरुद्ध अकोटफैल पोलिस ठाण्यात तक्रार केली. अरुण जाधव त्यांचे कुटुंबीय घरात बसले असताना पाच ते सहा जण तलवार, पाइप, काठ्या धारदार शस्त्र घेऊन घुसले.
त्यानंतर या कुटुंबीयांवर सशस्त्र हल्ला चढवण्यात आला. यामध्ये तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयामध्ये भरती केले. या घटनेनंतर दोन गटांत हाणामारी झाली. त्यात पाच ते सहा जण जखमी झाल्याने त्यांना सर्वोपचार रुग्णालयात भरती केले होते. मात्र, त्यानंतर ते रुग्णालयातून गपसार झाले. या सशस्त्र हल्ल्याची माहिती मिळताच अकोटफैल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणातील हल्लेखोर पसार झाल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.