आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेटफैलात क्रिकेट सट्ट्यावर छापा, एका जणास रंगेहात अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दक्षिणऑफ्रिका-वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यादरम्यान पोलिसांनी क्रिक्रेट सट्ट्यावर छापा टाकला. या वेळी पोलिसांनी एका जणाला रंगेहात अटक केली. ही कारवाई अकोटफैल पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान लक्ष्मीनगरातील इमामवाड्यात केली.

अकोटफैल पोलिसांचे बुधवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. दरम्यान, पोलिसांना इमामवाड्यात एका ठिकाणाहून आवाज आला. आवाजाच्या दिशेने पोलिस गेले असता त्यांना क्रिक्रेट सट्टा खेळल्या जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी छापा टाकून ११ मोबाइल्स, एक लॅपटॉप टीव्ही संच जप्त केला असून, पोलिसांनी युनूसअल अकबर अली याला अटक केली आहे.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक अनिल ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक डिगांबर शिंपी, दिनकर गुर्दे, पोलिस कॉन्स्टेबल अश्विन सिरसाट, विलास बंकावार, रवी गिऱ्हे यांनी केली. यापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने अकोट येथे क्रिकेट सटोडियांवर कारवाई केली होती. या कारवाईचा तपास पोलिस निरीक्षक अन्वर शेख यांच्याकडे देण्यात आला असून, ते या प्रकरणाचा तपास करीत आहेत, तर दुसरी कारवाई वाशीम जिल्ह्यात करण्यात आली होती.