आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्सनल आयडीवरून तिकिटांचा काळाबाजार, ‘बालाजी’वर आरपीएफचा छापा, एकाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पर्सनल आयडी वापरून लोकांच्या अकाउंटवरून रेल्वे प्रवासाच्या ई- तिकिटांची बुकिंग होत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा यंत्रणेला मिळाली. त्यांनी गुरुवारी छापे टाकून रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या बालाजी मोबाइलवर छापा टाकला. या वेळी एका जणाला अटक करून त्याच्याकडून ४५ हजार ७४१ रुपयांची २१ तिकिटे जप्त केली आहेत.

तिकिटांचा काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मुंबई रेल्वे क्राइम ब्रँच (सीव्हीआय) अनेक रेल्वे स्थानकावर लक्ष ठेऊन असते. अशीच एक कारवाई गुरुवारी या ब्रँचने भुसावळ रेल्वे क्राइम ब्रँच (सीआयबी) अकोला आरपीएफ यांनी संयुक्तपणे केली. या वेळी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या विजय गालानी याच्या बालाजी मोबाइलमध्ये छापा टाकला. या वेळी पर्सनल आयडी वापरून काढलेली ई-तिकीटे जप्त केली. या तिकिटांची किंमत ४५ हजार ७४१ रुपये आहे. या वेळी बालाजी मोबाइल शॉपीमधून कॉम्प्युटर इतर साहित्य जप्त केले आहे. पुढील कारवाई आरपीएफचे निरीक्षक राजेश बढे, यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक आशु शर्मा करत आहेत. कॉन्स्टेबल गणेश जकाते यांच्या तक्रारीवरून आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आणखी गैरप्रकारात कोण-कोण सहभागी आहे. त्याची चौकशी आरपीएफ करत आहे.

तिकिटे काढून दिल्या जाते कमिशन
बालाजी मोबाईल येथे रेल्वेच्या रिझव्हेशनची तिकिटे मिळतात. येथे आलेल्या प्रवाशांचा पर्सनल आयडी वापरून त्याच्यावरून ई-तिकिटांचे बुकिंग केल्या जाते. त्याबदल्यात ज्याचे पर्सनल आयडी वापरले त्याला कमीशनही देण्यात येत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. हा गैरव्यवहार असून, तिकिटांचा काळाबाजार आहे.
बातम्या आणखी आहेत...