आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार लाखांनी फसवणूक, जादूटोण्याच्या नावाखाली तिघांनी घातला गंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जादूटोण्याच्या नावाखाली तिघांनी एका कुटुंबाला चार लाख रुपयांनी गंडवले. बुधवारी याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मलकापूर येथे एका अपार्टमेंटमध्ये सधन कुटुंब राहते. त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये एक दाम्पत्य राहते. या दाम्पत्याने त्यांच्या एका जवळच्या नातेवाइकाच्या माध्यमातून या सधन कुटुंबाच्या भोळेपणाचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांनी त्या सधन कुटुंबातील घरातील प्रमुख महिलेशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. तुमच्या घरात नेहमी आजारपण मुलगा डॉक्टर असतानाही त्याचा व्यवसाय बऱ्यापैकी चालत नाही, त्यासाठी पूजाअर्चा करून वास्तुशांती करावी लागेल, असे म्हणून तुमच्या घरात सुखशांती नांदावी म्हणून आपणच पूजा करतो, असे सांगितले. त्यानंतर पूजा करण्याचे ठरले. त्या महिलेकडून या दाम्पत्याने त्यांच्या नातेवाइकाने ७८ हजार रुपये पुजेच्या साहित्यासाठी उकडले. त्यानंतर काही दिवसांनी घरातील सोन्याची पूजा करण्याचे त्यांनी सांगितले. सोन्याची पूजा करण्यासाठी सोने १६ दिवस कपाटातील लॉकरमध्ये ठेवून त्याला हातही लावण्याचे या तिघांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी सव्वातीन लाख रुपयांचे सोने १६ दिवस ठेवले. मात्र, त्यानंतर हे सोने घरातून गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या कुटुंबाच्या लक्षात आले. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...