आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणीचे अपहरण प्रकरण; आरोपीला २१ पर्यंत पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारंजा- स्थानिक गवळीपुऱ्यातील १९ वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणात अटक झालेल्या आरोपीस न्यायालयाने २१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तरुणीला १५ आॅगस्ट रोजी चौघांनी कारमध्ये डांबून ‘सिनेस्टाईल’ पळवले होते. यामधील एक अपहरणकर्ता ओळखीचा होता त्यामुळे तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वाशीम येथील वसीम उर्फ भुऱ्या इमाम भवानीवाले (वय ३०) याच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, पीडित तरुणीच्या बयाणावरून १८ आॅगस्ट रोजी कारंजा पोलिसांनी वाशीममधील बागवानपुऱ्यातील रहिवासी इमाम तुकडू भवानीवाले (वय ५४) याला अटक केली. आरोपीला १९ आॅगस्ट रोजी न्यायालयात सादर केल्यावर २१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक भगवान पायघन करित आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी तपास वेगाने व्हावा, ही मागणी आहे.
बातम्या आणखी आहेत...