आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अज्ञात लुटारुंचा गाडी अडवण्याचा प्रयत्न;दगडफेकीत व्यापारी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव- शहरात आणि तालुक्यातही चोरांनी धुमाकूळ घातलेला दिसत आहे. मार्गावरही वाटमारी करणारे सक्रिय झालेले दिसत आहेत. अज्ञात चोरांनी गाडी अडवून लुटण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या दगडफेकीमध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला. चालकाने प्रसंगावधान आेळखून गाडी पुढे काढल्याने अनर्थ टळला.

प्राप्त माहितीनुसार, १९ ऑगस्टच्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मालेगाव येथील कापड व्यापारी गोपाल भुतडा, गिरीश लाहोटी, श्याम काबरा, अनिल काबरा, अजय लाहोटी कापड खरेदीच्या निमित्ताने अमरावतीहून मालेगावकडे येत होते. डव्हा फाट्यावर नागरदास पुलाजवळ काही अज्ञात लुटारुंनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये मागच्या सीटवर बसलेले गोपाल भुतडा (३६) गंभीर जखमी झाले. चालकाने गाडी वेगात पुढे काढल्याने चोरांचा प्रयत्न फसला. गाडीच्या काचा फुटून किरकोळ नुकसान झाले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. भुतडा यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. रात्रीच्या घटनेची शहरामध्ये चर्चा होती.

घटनास्थळ जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनच्या हद्दीत येते तसेच गोपाल भुतडा यांनी या प्रकरणी तक्रार दिली नव्हती. दरम्यान, मालेगावचे ठाणेदार नाईकनवरे, जऊळक्याचे ठाणेदार आर. जी. शेख यांनी घटनास्थळाला भेट दिली. चोरट्यांचा शोध लावण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करित आहेत.

रात्रीची गस्त वाढवली
प्राप्तमाहितीच्या आधारे तपास सुरू आहे. या भागामध्ये रात्रीची गस्त वाढवली आहे. परंतु कालच्या प्रकरणात अद्याप तक्रार आलेली नाही. आर.जी. शेख, ठाणेदार, जऊळका रेल्वे.
बातम्या आणखी आहेत...