आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधम मामापासून स्वत:ला वाचवले; मग भीतीपाेटी शेतातच घालवली रात्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- आईची तब्येत ठिक नसल्याचे कारण सांगून सप्टेंबरला सायंकाळी मामाने भाचीला दुचाकीवरून शेतात नेले. अत्याचार करण्याच्या तयारीत असलेल्या नराधम मामाचा मुलीला संशय आल्याने तिने आधी त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. नंतर अत्याचाराच्या भीतीपोटी मुलीने संपूर्ण रात्रच शेतात काढली. सप्टेंबरला पहाटे काही ग्रामस्थांनी तिला पोलिस स्टेशनला पोहोचवले. नराधम मामाला पाेलिसांनी अटक केली असून, तो अकोल्याचा रहिवासी आहे.

अंजनगाव तालुक्यातील पांढरी येथील एका आश्रम शाळेत नववीमध्ये शिक्षणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीला तिचा मामाने “तुझ्या आईची तब्येत ठिक नाही, तिला अकोटला भरती केले आहे,’ असे सांगितले. मी तुला आईला भेटायला घेऊन जाण्यासाठी आलो आहे, तु माझ्यासोबत चल, असेही म्हटले. आईची तब्येत ठिक नसल्याचे ऐकल्यानंतर मुलीला थोडीही शंका आली नाही. तिला दुचाकीवर बसवून अकोटच्या दिशेने मामा निघाला.

अकोलखेड शेतशिवाराजवळून आड रस्त्याने दुचाकी नेली. शेतात अंधाराचा फायदा घेत त्याने मुलीला चाकुचा धाक दाखवला. घाबरलेल्या मुलीला काहीच सुचेनासे झाले होते. नराधम मामा अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असतानाच मुलीने तेथून पळ काढला. बराच वेळ शोध घेऊनही मुलगी सापडत नसल्याने पाहून नराधमाने बनाव करत काही नागरिकांना सांगितले की, माझ्या भाचीला तीन जणांनी उचलून नेले. पोलिस ग्रामस्थांनी मिळून शोध मोहीम राबवली. पोलिसांनी संशयावरून त्याला आधीच मामाला पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवले होते. पहाटे मुलगी नागरिकांना घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तिला धीर देऊन विचारणा केली असता सत्य समोर आले. या घटनेमुळे मुलीसह नातेवाइकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाल्याचे दिसून आले. अकोट ग्रामीण पोलिसांनी नराधम मामाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

त्याच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा अकोला येथे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मनवरे, ग्रामीणचे ठाणेदार सतीश पाटील, पोलिस कर्मचाऱ्यांनी गांभीर्य ओळखून परिसर पिंजून काढला. मामाच्या वर्तनावरून ठाणेदार पाटील यांना संशय निर्माण झाल्याने पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी आणले होते. या घटनेचा तपास बाळासाहेब नाईक करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...