आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेस्थानक परिसरात प्राणघातक हल्ला,हल्लेखोर फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जुन्यावादातून युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यात तो गंभीर जखमी झाला. पोलिस घटनास्थळावर पोहचताच पाच ते सहा हल्लेखोर पळून गेले. ही घटना रविवारी सकाळी वाजता रेल्वेस्थानकासमोरील प्रवेशद्वारासमोर घडली.

फैजल खान खलील खान वय २३ रा. पुरपीडित कॉर्टर असे जखमी युवकाचे नाव आहे. विदर्भ एक्स्प्रेसने नागपूरला जाण्यासाठी फैजल खान रविवारी सकाळी वाजता रेल्वेस्थानकावर पोहचला. गाडीला उशिर असल्यामुळे तो ऑटोस्टॅण्डवर त्याच्या दोन मित्राशी बोलत उभा होता.

एका तासानंतर तेथे ऑटोतून दोन दुचाकीवरून पाच ते सहा जण आले. त्यांच्या हातात काठी धारदार शस्त्र होते. त्यांनी फैजलखान याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो रेल्वेच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पळत सुटला. हल्लेखारांनी त्याचा पाठलाग करून त्यांच्या मांडीवर पोटावर शस्त्राने घाव केले. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तो खाली पडला.

उपस्थित पोलिसांनी धाव घेतली असता हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी फैजलखान यास सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. फैजल खान हा आरोपीला ओळखत असल्यामुळे त्याने हल्लेखोरांची नावे सांगितली . त्यावरून पोलिसांनी शेख तस्लीम शेख गणी वय ३२, शेख जमीर शेख गणी उर्फ बब्बु, शेख रहीम शेख गणी, बाबा, इजाज खान निरबाज खान सर्व रा. अकोट फैल यांच्याविरूद्ध भांदवी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

जुन्यावादातून झाला हल्ला फैजलखान खलील खान आरोपींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहेत. त्यांचा वाद न्यायालयात पोहचला आहे. जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

रेल्वे परिसर असुरक्षित
रेल्वेस्थानक परिसर सुरक्षेच्या दृष्टीने प्रवाशांसाठी असुरक्षित परिसर ठरत आहे. येथे दररोज चोरीच्या अाणि लुटमारीच्या घटना घडत आहेत. या घटनांना आवर घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे. अनेकवेळा येथे पोलिसांवरच हल्ले झाल्यामुळे येथील हल्लेखोर शिरजोर झाल्याचे दिसून येत आहे. पोलिस मात्र येथे बघ्यांची भूमिका घेत असल्यामुळे बदमाशांचे फावले आहे.

पोलिस छावणी नावालाच
ज्या उदात्त हेतूने जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी पोलिस छावणीची निर्मिती केली. ती छावणी आता शोभेची वस्तू बनली आहे. सुरुवातीला या छावणीमध्ये पाच ते सहा पोलिस कर्मचारी असायचे. आता तर या छावणीमध्ये कधीतरी एखादा कर्मचारी दिसून येतो. या चौकीत पुन्हा चार ते पाच कर्मचाऱ्यांची ड्युटी असणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...