आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून करून महिलेला टाकले रेल्वे रुळावर, दोघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- बोरगावमंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अन्वी मिर्झापूर रेल्वे गेटजवळ अॉक्टोबरच्या मध्यरात्री एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. यासंदर्भात रेल्वे गँगमनने बोरगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला होता. मात्र, याप्रकरणी घातपाताची शक्यता वाटल्याने ठाणेदारांनी वरिष्ठांना माहिती दिली.
त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक, एसडीपीओंनी या घटनेचा बारकाईने तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून ठाणेदार भास्कर तवर त्यांच्या सहकाऱ्यांनी कसून शोध घेतला असता, त्या महिलेचा आकस्मिक मृत्यू नसून, खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध १५ ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला असता मृतदेहाजवळ आढळलेल्या मोबाइलवरून त्या महिलेची आेळख पटली. याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेण्यासाठी त्या महिलेच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स मिळवले तपासाची चक्रे फिरवली असता आरोपींचा शोध लागला. पिंटू उर्फ सतीश सुरेश अंभोरे (वय ३०) गोटू उर्फ राजेश बनसोड (वय २७) दोघेही रा. मूर्तिजापूर, अशी आरोपींची नावे असून, त्यांनी या महिलेला दुचाकीवरून अज्ञातस्थळी नेले त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला तिचे हातपाय बांधून तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह अन्वी मिर्झापूर रेल्वे गेटजवळ आणून टाकल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ही हत्या अनैतिक संबधातून झाली असावी, अशी शक्यता पाेलिसांनी वर्तवली अाहे. याप्रकरणी आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १९ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार भास्कर तवर करत अाहे.

तपास आव्हानात्मक होता
याप्रकरणीमृतक महिलेची ओळख पटवणे आराेपींचा शोध घेणे आव्हानात्मक बनले होते. मात्र, वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन बारकार्इने तपास केल्यामुळेच या घटनेतील गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे एसडीपीओ नंदकुमार काळे बोरगावमंजूचे ठाणेदार भास्कर तवर यांनी सांगितले.