आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहाचे आमिष देऊन दोन अल्पवयीन मुलींना पळवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - विवाहाचे आमिष दाखवून १७ वर्षीय दोन युवतींना पळवून नेल्याची घटना तालुक्यातील आंबेटाकळी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

यासंदर्भात अल्पवयीन युवतींच्या नातेवाइकांनी रविवारी हिवरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, विवाहाचे आमिष देत लाखनवाडा येथील जलील खान इब्राहिम खान शेख शेरू शेख बब्बू या दोन युवकांनी अल्पवयीन मुलींना पळवून नेले. या कामी त्यांना इब्राहिम खान आमिर खान, रुख्सानाबी इब्राहिम खान, शे. बब्बू शे. हसन, शे. रहमाबी शे. बब्बू यांनी मदत केली. या तक्रारीवरून सहा जणाविरुद्ध गुन्हे दाखल केले.
बातम्या आणखी आहेत...