आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या वादातून युवकावर केला प्राणघातक हल्ला,दर्यापूर येथील जयस्तंभ चौकामध्ये घडाली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर- शहरातील रहदारीच्या गजबजलेल्या जयस्तंभ चौकात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी गुरुवारी रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान युवकावर प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.

या हल्ल्यात सागर नारायण जयसिंगपुरे (२८)हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गांधीनगर येथील रहिवासी सागर जयसिंगपुरे हा पवन सूरपाटणे यांच्या पानटपरीवर खर्रा खाण्यासाठी गेला असता घटनेतील आरोपी धनराज खत्री (२५, रा. बनोसा )याने जुन्या वादातून सागरवर अचानक हल्ला करून त्याच्या छातीवर कमरेवर चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर जयस्तंभ चौकात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी सागरचे वडील नारायण जयसिंगपुरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मध्यरात्री आरोपी धनराजचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली. ठाणेदार नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.दरम्यान, काही दिवसांपासून शहरात क्षुल्लक कारणांवरून हल्ला करण्याचे प्रमाण वाढले असून, अशा आरोपींवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...