आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणीच्या अपहरण प्रकरणाला कलाटणी; तपासाला मिळाली गती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारंजा- स्थानिक गवळीपुऱ्यातील १९ वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणाला बुधवारी (दि.१७) वेगळीच कलाटणी मिळाली. यातील अपहरणकर्त्यांनीच तरुणीला तिच्या शिरपूर येथील नातेवाईकांकडे सोडले आणि तेथून पोबारा केला. तिला येथील पोलिसांनी ताब्यात घेऊन तिचे बयान नोंदवले आहे. यामध्ये पीडित तरुणीने काही खळबळजनक खुलासे केल्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येथील १९ वर्षीय तरुणी सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तिच्या बहिणीसोबत घराजवळ उभी असताना वसीम उर्फ भुऱ्या इमाम भवानीवाले (वय ३०) याने इतर तिघांच्या मदतीने तिचे कारमधून ‘सिनेस्टाईल’ अपहरण केले. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वसीम भवानीवाले याच्यासह इतर तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भगवान पायघन यांनी आरोपीला अटक करण्यासाठी परिसरात तातडीने नाकाबंदी केली. तसेच शेलूबाजार आणि धनज बुद्रूक येथील आरोपीच्या शेतात जाऊनही शोध घेण्यात आला. परंतु त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान, मंगळवारी रात्री वाजताच्या सुमारास अपहरण केलेल्या तरुणीला शिरपूर जैन येथील तिच्या कुटुंबाच्या घरासमोर सोडून अपहरणकर्त्यांनी पळ काढला. तरुणीने नातेवाईकाच्या घरून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन तिला रात्री घरी आणले. मुलगी घरी परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

असेआहे तरुणीचेे बयान : तरुणीलापळवून नेल्यानंतर तिची अपहरकर्त्यांनीच सुखरूप सुटका केली़ ती घरी परतल्याने पोलिसांची चिंता दूर झाली़ मात्र, अपहरकर्त्यांनी तिला जबरदस्तीने पळवून नेले होते हे आता तरुणीच्या बयाणावरून सिद्ध झाले आहे. शिरपूर येथून तरुणीला कारंजात आणल्यानंतर बुधवारी स्थानिक पोलिसांनी तिचे बयान नोंदवले. तपास सुरू आहे.

आरोपी शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
अपहरण झालेली तरुणी घरी परतल्याने येथील पोलिसांसमोर आरोपींना अटक करण्याचे आव्हान उभे झाले आहे़ तरुणीचे अपहरण झाल्यानंतर हे प्रेमप्रकरण असावे अशी शंका उपस्थित होत होती़ मात्र, तरुणीने खुद्द तिला जबरदस्ती पळवून नेण्यात आल्याचे सांगितले आहे़ १८ आॅगस्ट रोजी तिला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे़ तिने पोलिसांसमोर दिलेले बयाण न्यायालयात कायम ठेवले तर आरोपींची संख्या वर पोहोचू शकते़ तसेच या प्रकरणातील आरोपींना लवकरच जेरबंद करू असे तपास अधिकारी भगवान पायघन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...