आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणीच्या अपहरण प्रकरणात एकाला अटक; आरोपींवर नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारंजा- स्थानिक गवळीपुऱ्यातील १९ वर्षीय युवतीच्या अपहरण प्रकरणात सामील झाल्याच्या कारणावरुन शहर पोलिसांनी १८ आॅगस्ट रोजी मुख्य आरोपीच्या वडिलास अटक केली आहे. इमाम तुकडू भवानीवाले (वय ५४) रा. बागवानपुरा, वाशीम असे आरोपीचे नाव असून, या प्रकरणात पोलिसांनी एक संशयित कारही ताब्यात घेतली आहे.

येथील तरुणीला १५ आॅगस्ट रोजी चौघांनी कारमध्ये डांबून ‘सिनेस्टाईल’ पळवले होते. यामधील एक अपहरणकर्ता ओळखीचा होता. त्यामुळे तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी वाशीम येथील वसीम उर्फ भुऱ्या इमाम भवानीवाले (वय ३०) याच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. मात्र, पोलिसांना ते आढळले नाहीत. त्यामुळे या घटनेबाबत तर्कवितर्क काढले जात असताना १६ आॅगस्ट रोजी रात्री वाजताच्या सुमारास अपहरकर्त्यांनी तरुणीला तिच्या शिरपूर येथील नातेवाईकांकडे सोडून पोबारा केल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. युवतीच्या माहितीनुसार अपहरणात मुख्य आरोपी वसीम भवानीवाले याला त्याचा भाऊ नदीम भवानीवाले (वय २८) कलीम रेघीवाले (वय ४६) रा. शिरपूर जैन यांनीही मदत केली. दरम्यान, पीडित तरुणीच्या बयाणावरून १८ आॅगस्ट रोजी कारंजा पोलिसांनी वाशीममधील बागवानपुऱ्यातील रहिवासी इमाम तुकडू भवानीवाले याला अटक केली. त्याला उद्या न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. याशिवाय पोलिसांनी एक कारही ताब्यात घेतली आहे. ही कार आरोपींनी अपहरणात वापरली अशी पोलिसांना शंका आहे. १९ रोजी तरुणीकडून कारची पुष्टी केली जाईल, अशी माहिती तपास अधिकारी भगवान पायघन यांनी दिली. या घटनेतील अन्य आरोपींचा शोध पाेलिस घेत आहेत. त्याकडे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...