आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला साखळदंडाने बांधल्याप्रकरणी गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर- वृद्धआईला पलंगावर साखळदंडाने बांधून फिरण्यास मज्जाव करणाऱ्या मुलाच्या दुष्कृत्याचा सोशल मिडीयाने पर्दाफाश केला. आईला मरणयातना भोगायला लावणारा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच शहर पोलिसांनी सोमवारी २२ फेब्रुवारी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.शहरातील हनुमान नगरात राहणाऱ्या हरिदास गणबास वय ४५ याने ९० वर्षीय वृद्ध आईला पलंगाला साखळदंडाने बांधून ठेवत तिला फिरण्यास मनाई केली.
मुलाकडून होत असलेला छळ वृद्ध आई मागील काही दिवसांपासून सहन करीत होती. दरम्यान वृद्ध महिलेला न्याय मिळावा, यासाठी अज्ञात व्यक्तीने या घटनेचे चित्रण करून हा व्हिडीओ सोशल मिडीवर अपलोड केला. काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ हा उपविभागीय पोलिस अधिकारी शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांना दाखवला. त्यांनी या घटनेची दखल घेत एपीआय राहुल मोरे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर एपीअाय मोरे यांनी घटनास्थळी धाव घेवून साखळदंडाने बांधून ठेवलेल्या वृद्ध महिलेची सुटका करून तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सुकेशनी ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरिदास गणबास याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.
मलकापूर येथे साखळदंडाने बांधलेली वृध्द महिला