आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेगावात वृद्ध भिकाऱ्याचा दोन युवकांनी केला खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव- येथील श्री गजानन महाराज मंदिरासमोर भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका ६० वर्षीय भिकाऱ्याचा जुन्या वादातून दोघांनी खून केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी मंदिर रोडवर घडली.

स्थानिक गांधीचौक परिसरातील एका देशी दारूच्या दुकानातून जगदिशसिंग खेमसिंग शिलखत्री हा वृध्द दारू पिवून परत येत होता. यावेळी जुन्या वादातून दोन युवकांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर युवकांनी त्याला लोटून दिल्यानंतर त्याचे डोके फुटपाथवरील पेव्हर ब्लॉकवर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच दोन्ही आरोपी युवक घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी भवानी कार पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजेसची पडताळणी केली असता त्यामध्ये दोन युवक या भिकाऱ्याला मारहाण करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोन्ही युवकांची ओळख पटवून अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आरोपी राजेश वय २२ रुपेश वय २१ यांना जेरबंद केले. दरम्यान, मृतकाची पत्नी मंगला शिलखत्री यांनी पोलिसात तक्रार नोंदविली की, पती जगदिशसिंग हे गजानन महाराज मंदिरासमोर भीक मागतात. आठ दिवसांपूर्वी राजेश रुपेश यांचेशी जागेवर उभे राहण्यावरून वाद झाला होता. यावेळी त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती मंगळवारी आपल्या पतीला त्यांनी ठार मारले आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे.
बातम्या आणखी आहेत...