आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा विळ्याने वार करून खून; पतीने केली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा - आईवडील एकमेकांपासून विभक्त असल्यामुळे संभाजी हा लहानपणीच त्याच्या आईसोबत मामाच्या गावी आडसूळ येथे राहायला आला होता. मामानेच त्याचे तीन महिन्यांपूर्वी हात पिवळे करून दिले. सुखी संसार सुरू असताना त्यांच्या संसाराला अचानक दृष्ट लागली. संभाजीच्या मनात उलटसुलट विचार आले. त्या भरात त्याने मध्यरात्री पत्नीचा विळा मारून खून केला आणि स्वत:ही वाहनापुढे झोकून देऊन आत्महत्या केल्याची ह्दयद्रावक घटना रविवारी रात्री तेल्हारा तालुक्यातील आडसूळ या गावी घडली. आधीच पतीचे छत्र हरवलेली आई मात्र मुलगा गेल्यामुळे पोरकी झाली आहे.
दहिगाव अवताडे येथील रहिवासी संदीप उर्फ संभाजी पुंजाजी शेळके (वय २५) लहानपणापासूनच त्याच्या आईसोबत मामा बाळकृष्ण नवलकार रा. आडसूळ येथे वास्तव्यास होता. अल्पभूधारक असलेल्या संदीपला शासनाकडून घरकुलाचाही लाभ मिळाला होता. मामाच त्याचे कर्तेधर्ते असल्यामुळे त्यांनी २८ एप्रिल २०१५ रोजी त्याचा विवाह बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील सुरेश सोनोने यांची मुलगी स्वाती (वय २२) सोबत झाला. लग्नानंतर त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. ३० जूलै रोजी संदीपची पत्नी आखाडीसाठी माहेरी गेली होती. ऑगस्टला संदीप पत्नीला घेण्यासाठी सासुरवाडीला गेला पत्नीला घेऊन त्याच दिवशी आडसूळ येथे परत आला. घरी आल्यानंतर संदीप त्याची आई आशा आणि पत्नी स्वाती यांनी रात्रीला एकत्र जेवणही केले. त्यानंतर संदीपची आई भावाच्या घरी झोपण्यासाठी गेली. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास गावातीलच पशुवैद्य डॉ. उमेश नवलकार यांचा संदीपचे मामा बाळकृष्ण नवलकार यांना फोन आला.

अकोल्याहून परत येत असताना गाडीच्या प्रकाशात बाळापूर तालुक्यातील कारंजा ते अंदुरा दरम्यान रस्त्याच्या कडेला संदीप जखमी अवस्थेत दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. संदीप तर घरी झोपला होता. एवढ्या रात्री तिकडे कशाला जाणार असा विचार करत त्याच्या मामाने संदीपच्या घराकडे धाव घेतली असता त्यांना घराचा दरवाजा बाहेरून बंद दिसला. बाळकृष्ण नवलकारने आवाज दिला, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थरथरत्या हातांनी त्यांनी संदीपच्या घराचा दरवाजा उघडला असता त्यांना स्वातीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती त्यांनी गावचे पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सदानंद नवलकार यांच्या साहाय्याने तेल्हारा पोलिसांना दिली. दरम्यान, जखमी संदीपला रुग्णवाहिकेतून अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती स्वातीच्या माहेरी दिल्यानंतर स्वातीची आई, वडील सर्व नातलग आडसूळ येथे दाखल झाले. मुलीचा मृतदेह पाहताच स्वातीचे वडील कोसळले. याप्रकरणी बाळकृष्ण नवलकार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप शेळकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी अकोटचे प्रभारी एसडीपीओ विक्रांत देशमुख जिल्हा परिषद सदस्य पुंडलिकराव अरबट यांनी भेट दिली आहे.
स्वातीच्यागळ्याभोवती आढळला तार : शवविच्छेदनादरम्यानस्वातीच्या गळ्याभोवती तारेचा तुकडा आढळून आल्याची माहिती आहे. त्यामुळे तिला आधी गळफास दिला असावा आणि नंतर विळ्याने मारुन जखमी केले असावे, असा संशय व्यक्त होत आहे.


एकुलता आधार : संभाजीएकुलता एक मुलगा होता. वडील आईपासून विभक्त असल्यामुळे तो आईचा एकुलता एक आधार होता. तोही गेल्यामुळे ती आता सुन्न झाली आहे.

वादातून हत्याकांड
संदीपस्वातीमध्ये वाद झाला असावा त्यातूनच हे हत्याकांड घडले असावे, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. या हत्याकांडापूर्वी एकत्र जेवण करून स्वातीची हत्या करेपर्यंतही कुणालाही आवाज का आला नाही, संदीप कारंजा-अंदुरा रस्त्यावर कसा पोहोचला, त्याला आत्महत्या करायची होती की, अज्ञात वाहनाच्या धडकेत तो जखमी झाला या सर्व प्रश्नांचा खुलासा पोलिस तपासात समोर येणार असून, पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...